शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

दारूविक्रीच्या स्पर्धेतून युवकाची निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 05:01 IST

राहुल किसना मगर (३५) रा. साटोडा असे मृताचे नाव आहे. कारला येथील एका मंदिरासमोर राहुलला बोलावून तिघांनी त्याच्या पोटावर धारदार शस्त्राने वार करुन रक्ताच्या थारोळ्यात पाडले. गावकऱ्यांनी लागलीच धाव घेत रक्तबंबाळ अवस्थेत राहुलला सेवाग्राम रुग्णालयाल दाखल केले. पण, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. राहुलचे वडील किसना यांच्या तक्रारीवरून सांवगी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देपोलिसांची डोळेझाक कारणीभूत : कारलावासीयांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लॉकडाऊनमुळे विदेशी दारू मिळणे अवघड झाल्याने दारूविक्रेते गावठी दारूविक्रीकडे वळले आहेत. अशातच काही विक्रेत्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली असून दारूविक्रेत्यांच्या या स्पर्धेतूनच तिघांनी मिळून एका युवकाचा ‘गेम’ केला. गुरुवारी दुपारी १ वाजता शहरालगतच्या कारला या गावात ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.राहुल किसना मगर (३५) रा. साटोडा असे मृताचे नाव आहे. कारला येथील एका मंदिरासमोर राहुलला बोलावून तिघांनी त्याच्या पोटावर धारदार शस्त्राने वार करुन रक्ताच्या थारोळ्यात पाडले. गावकऱ्यांनी लागलीच धाव घेत रक्तबंबाळ अवस्थेत राहुलला सेवाग्राम रुग्णालयाल दाखल केले. पण, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. राहुलचे वडील किसना यांच्या तक्रारीवरून सांवगी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना ताब्यात घेतले आहे. राहुल हा साटोडा गावात दारूविक्रीचा व्यवसाय करीत होता. गावात वाढती दारूविक्री पाहता महिला मंडळाने गावातून दारूविक्री बंद केली.लगतच्या कारला गावात श्रावण राऊत व छन्नू नामक व्यक्ती दारुविक्रीचा व्यवसाय करीत असल्याने राहुलने श्रावणशी हात मिळवणी करून आपला नव्याने व्यवसाय सुरू केला. त्यामुळे छन्नूच्या व्यवसायावर परिणाम झाल्याने गुरुवारी सकाळी राहुल व छन्नू या दोघांत वाद झाला. या वादातूनच ही हत्या झाल्याचा संशय गावकºयांकडून व्यक्त केला जात आहे.गावकºयांच्या तक्रारीकडे पोलिसांची पाठमागील काही दिवसांपासून कारला गावात दारूचा महापूर ओसंडून वाहत होता. श्रावण, छन्नू आणि राहूल हे तिघेही राजरोसपणे गावठी दारूची विक्री करीत होते. याबाबत कारला येथील बचत गटाच्या महिलांसह नागरिकांनी सावंगी पोलिसांना माहिती दिली. पण, त्यांनी दखल घेतली नाही. अखेर आमदारासह पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या दारूविक्रेत्यावर कारवाई केली. सावंगी पोलिसांच्या निष्क्रियतेमुळेच राहुलची हत्या झाल्याचा आरोप गावकºयांनी केला आहे.एका तासात आरोपी ताब्यातकारला गावात झालेल्या हत्येच्या घटनेतील तिन्ही आरोपींना अवघ्या एका तासात शोधून काढले. सर्व आरोपी सावंगी पोलिसांच्या ताब्यात आहेत. पैशाच्या देवणा-घेवाणीतून आणि जुन्या वादातून राहुल मगरची हत्या झाल्याचा अंदाज सावंगी पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे. तपासाअंतीच हत्येचे कारण कळू शकेल, असे सावंगीचे ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे यांनी सांगितले.

टॅग्स :Murderखूनliquor banदारूबंदी