मारहाण करून रोख पळविणाऱ्यास ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 00:37 IST2019-02-13T00:36:09+5:302019-02-13T00:37:17+5:30
मारहाण करून २५ हजारांची रोख पळवून नेणाºयास समुद्रपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात हूडकून काढत जेरबंद केले आहे. सदर आरोपीपासून पोलिसांनी चोरीतील रोख व इतर साहित्य जप्त केले आहे.

मारहाण करून रोख पळविणाऱ्यास ठोकल्या बेड्या
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : मारहाण करून २५ हजारांची रोख पळवून नेणाºयास समुद्रपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात हूडकून काढत जेरबंद केले आहे. सदर आरोपीपासून पोलिसांनी चोरीतील रोख व इतर साहित्य जप्त केले आहे.
प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूर येथील अविनाश वायकोर हे नागपूर येथून चंद्रपूरकडे कारने जात असता ते चहा घेण्यासाठी जाम येथे थांबले. वाहन उभे करीत असताना अभिजीत वरोकर हा तेथे आला. त्याने मलाही चंद्रपूरला सोबत घेऊन चला असे सांगितले. परंतु, त्याच्याकडे दारूसाठा असल्याने वायकोर यांनी त्याला सोबत घेण्यास नकार दिला. कारमध्ये मला का सोबत घेत नाही, असे म्हणत अभिजित वरोकर याने अविनाश याच्याशी वाद करून तक्रारकर्त्यासह तक्रारकर्त्यांच्या मित्राला मारहाण करून त्यांच्या जवळील २५ हजारांची रोख चोरून पळ काढला. या प्रकरणी अविनाश वायकोर यांच्या तक्रारीवरून समुद्रपूर पोलीस ठाण्यात भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पारडकर यांच्याकडे देण्यात आला. त्यांनी गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस कर्मचारी अरविंद येनुरकर, रवी पुरोहित, आशीष गेडाम, वैभव चरडे यांच्या मदतीने जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यातून आरोपीला हुडकून काढत त्याला जेरबंद केले. शिवाय त्याच्याकडून चोरीची रक्कम जप्त केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची १३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, समुद्रपूरचे ठाणेदार प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पारडकर, अरविंद येनुरकर, रवी पुरोहित, रवी वर्मा, वैभव चरडे, आशीष गेडाम आदींनी केली. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पारडकर करीत आहेत.