शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

भाजप सरकार केवळ घोषणाबाजी करणारेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2018 11:46 PM

गेल्या साडेचार वर्षात युती शासनाने महाराष्ट्रात योजनाचा पाऊस पाडला. योजनांच्या नावावर कोट्यावधी रुपये उभारून त्या माध्यमातून सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता हे समीकरण पक्के केले. मात्र, सामान्यांच्या समस्येवर कायम तोडगा काढला नाही.

ठळक मुद्देअशोक चव्हाण : काँग्रेसची राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : गेल्या साडेचार वर्षात युती शासनाने महाराष्ट्रात योजनाचा पाऊस पाडला. योजनांच्या नावावर कोट्यावधी रुपये उभारून त्या माध्यमातून सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता हे समीकरण पक्के केले. मात्र, सामान्यांच्या समस्येवर कायम तोडगा काढला नाही. महाराष्ट्रामध्ये खोट्या थापा मारून सरकार सत्तेवर आहे. कर्जमाफीत सरकार फसले. बोंडअळीचे अनुदान नाही. सर्वच पातळ्यांवर या युती सरकारने सामान्यांची निराशाच केली. हे सरकार घोषणेपलीकडे गेलेच नाही. या खोटारड्या सकारला सत्तेतून बाहेर खेचण्याचा संकल्प करा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले.काँग्रेसच्यावतीने राज्यव्यापी जनसघर्ष यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा मंगळवारी रात्री आर्वीत दाखल झाल्यानंतर स्थानिक गांधी चौक येथे जाहीर सभा पार पडली. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रीय काँग्रेस कमेटीचे सचिव सुरजेवाला, माजी खासदार विलास मुत्तेमवार, प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष माणिकराव ठाकरे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. चारूलता टोकस, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, यशोमती ठाकूर, डॉ. आशीष देशमुख, नसीम खान, रणजीत कांबळे, युवक काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे, माजी आमदार राजू तिमांडे, शेखर शेंडे, हेमलता मेघे, अ‍ॅड. नंदा पराते, आ. अमर काळे आदी उपस्थित होते. खा. चव्हाण पुढे म्हणाले, जेव्हा जेव्हा काँग्रेस पक्ष अडचणीत आला तेव्हा तेव्हा विदर्भाने काँग्रेसने बळ देण्याचे काम केले आहे. युती शासनाने साडेचार वर्षात महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला हे विचारण्याची वेळ आता आली आहे. सरकारचे ३२ हजार कोटी पेक्षा जास्त बजेट झाले आहे. हा महाराष्ट्र अधिक कर्जात बुडविण्याचे पाप हे युती सरकारचे आहे. हे सरकार फेकू सरकार असल्याची टीका यावेळी त्यांनी केली. रामाचं नाव घ्या आणि निवडणुका जिंका हा एकच मंत्र सध्या भाजपा सरकार राबवतय आहे. यापासून आता साधव राहण्याची गरज आहे. कार्यक्रमात तळेगाव येथील शिख बांधवांनी खा. अशोक चव्हाण यांना तलवार भेट दिली. तर तालुक्यातील वाठोडा येथील युवा चित्रपट निर्माता गणेश पाटील यांनी निर्मिती केलेल्या ‘तू तिथे असावी’ या चित्रपटाच्या निर्मितीबद्दल पाटील यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर खरांगणा येथील भाजपाचे पदाधिकारी मनोज सतीजा व दुर्गा काळे यांनी खा. अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. याप्रसंगी अरूण बाजारे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, आ. यशोमती ठाकूर, आ. डॉ. आशीष देशमुख, आ. नसीम खान, अ‍ॅड. चारूलता टोकस, बालाजी गाडे, सत्यजीत तांबे आदींनी मनोगत व्यक्त केले.निवडणुकीच्या तोंडावर राम आठवतो : अमर काळेशेतकरी आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर या युती शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. निवडणुकीला आल्या की त्यांना राम आठवतो. राम शब्दाचे पक्के होते. रामाचं नाव घेऊन सत्तेवर येणाºयांची रामाच नाव घेण्याची लायकी नाही. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाचे ‘अबकी बार मोदी सरकार’ तर आता २०१९ च्या निवडणुकीत मोदी सरकार बस कर यार असा आमचा नारा आहे. या सरकारला निवडणुकीतून धडा शिकविण्याचे आवाहन याप्रसंगी आ. अमर काळे यांनी केले.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेस