आयुर्वेदासाठी वरदान ठरणारी बिब्बा डिशेलीस मशीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 00:49 IST2018-06-11T00:49:16+5:302018-06-11T00:49:24+5:30
येथील शंकरप्रसाद अग्निहोत्री अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांनी संशोधन कार्य करून आयुर्वेदिक उत्पादनात उपयोगी पडणारी बिब्बा डिशेलीस मशीन तयार केली आहे.

आयुर्वेदासाठी वरदान ठरणारी बिब्बा डिशेलीस मशीन
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येथील शंकरप्रसाद अग्निहोत्री अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांनी संशोधन कार्य करून आयुर्वेदिक उत्पादनात उपयोगी पडणारी बिब्बा डिशेलीस मशीन तयार केली आहे.
सदर संशोधन कार्य करणाऱ्यामध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी झेन अन्सारी, निलेश यादव, मोहित कटरे, अरहम अन्सारी, महेश वैद्य, पंकज तिमांडे, विवेक नंदेश्वर यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना सदर प्रोजेक्टसाठी गाईड म्हणून मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा. प्रशांत रेवतकर व सहायक प्राध्यापक दिलीप रंगारी यांचे मार्गदर्शन लाभले. सदर संशोधन कामासाठी शंकरप्रसाद अग्निहोत्री अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागाच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा मागील दोन वर्षापासून अभ्यास सुरू होता. अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील सर्व विषयांचे पुस्तकी ज्ञान व क्षेत्राचा अभ्यास करून संशोधन कार्य सुरू केले. निरंतर परिश्रम व जिद्द बाळगून आयुर्वेदिक औषधी उत्पादनात उपयोगी पडणाºया बिब्बा डिशेलीस मशीन तयार करून संशोधन कार्य केले. या डिशेलीस मशीन निर्मितीसाठी संस्थापक शंकरप्रसाद अग्निहोत्री, सचिव सचिन अग्निहोत्री, प्राचार्य डॉ. राजकिशोर तुगनायातसह एमगिरीचे तांत्रिक सहायक गणेश थेरे व महेश बाहुते यांचे मार्गदर्शन व सहाय्य लाभले.
हाताने वा दगडाने ठेचण्याचे काम टाळता येईल
बिब्याच्या वरच्या भागात अत्यंत दाहक पण अत्यंत विलक्षण गुणकारी तेल असते. बिब्बाच्या आतल्या बी मध्ये असलेल्या गोडांबित खूप पौष्टिक द्रव्ये आहेत.आजही विविध भागांमध्ये बिबचे तेल अथवा गोडांबी हे हाताच्या सहायाने व दगडाने ठेचून काढण्यात येते. परंतु हे करीत असताना काम करणाºयाला तेलामुळे शरीरावर इजा होतात व चेहºयावर तेल उडून चेहरा कायमचा विद्रुप होवू शकतो.
विद्यार्थ्यांनी अभियंता म्हणून बाहेर पडताना अभियांत्रिकी शिक्षणासोबत लोकांच्या समस्या व अडचणी ओळखून आपल्या ज्ञानाचा उपयोग केला पाहिजे. ज्ञान व उपयोगिता याची सांगड अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना घालता आली तरच भारत सरकारच्या स्कील इंडिया डेव्हलपमेंटची खºया अर्थाने अंमलबजावणी होईल. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी उद्योजक होण्याचे स्वप्न पाहिले पाहिजे. युवा अभियंता नोकरीच्या मागे न लागता नोकरी देणारा उद्योजक झाले पाहिजे.
- प्रा. प्रशांत रेवतकर, अभियांत्रिकी विभाग प्रमुख