अतिक्रमण धारकांची भूदेव यात्रा वर्ध्याकडून नागपूरकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 13:48 IST2018-03-20T13:47:53+5:302018-03-20T13:48:01+5:30

शासकीय जागेवर अतिक्र मण करून राहणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला नि:शुल्क जमिनीचे पट्टे देण्यात यावे, या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी भू-देव यात्रा मंगळवारी काढण्यात आली.

Bhudev Yatra of encroachment holders move to Nagpur | अतिक्रमण धारकांची भूदेव यात्रा वर्ध्याकडून नागपूरकडे रवाना

अतिक्रमण धारकांची भूदेव यात्रा वर्ध्याकडून नागपूरकडे रवाना

ठळक मुद्देप्रत्येक कुटुंबाला नि:शुल्क जमिनीचे पट्टे देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शासकीय जागेवर अतिक्र मण करून राहणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला नि:शुल्क जमिनीचे पट्टे देण्यात यावे, या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी भू-देव यात्रा मंगळवारी काढण्यात आली. युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या भु-देव यात्रेने शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण केले. त्यानंतर सदर पद यात्रा नागपूरच्या दिशेने रवाना झाली. यात्रेचे नेतृत्व युवा परिवर्तन की आवाजचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे करीत असून यात्रेत जिल्ह्यातील अतिक्र मण धारक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. ही भु-देव यात्रा शुक्र वार २३ मार्चला नागपूर येथील मुख्यमंत्री सचिवालयावर धडक देणार आहे.

Web Title: Bhudev Yatra of encroachment holders move to Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.