शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
3
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
4
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
5
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
6
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
7
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
8
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
9
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
10
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
11
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
12
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
13
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
14
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
15
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
16
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
17
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
18
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
19
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
20
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक

अनुत्तीर्ण ६,४०५ विद्यार्थी घेणार संधीचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 9:58 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून पुरवणी परीक्षेची संधी उपलब्ध करुन दिली आहे. जुलै २०१९ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी व दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी शिक्षण विभाग सज्ज झाला आहे.

ठळक मुद्देदहावी-बारावीची पुरवणी परीक्षा : १७ जुलैपासून प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून पुरवणी परीक्षेची संधी उपलब्ध करुन दिली आहे. जुलै २०१९ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी व दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी शिक्षण विभाग सज्ज झाला आहे. इयत्ता दहावीसाठी ४ हजार ७९ तर इयत्ता बारावीसाठी २ हजार ३२६ असे दोन्ही मिळून ६ हजार ४०५ अनुत्तीर्ण विद्यार्थी या पुरवणी परीक्षेला सामोरे जाणार आहे.फेब्रुवारी महिन्यामध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेकरिता जिल्ह्यातील १७ हजार ४६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी १७ हजार ३२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल २८ मे रोजी जाहीर झाला असता त्यात १३ हजार ७१५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर ३ हजार ३३१ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते. तसेच दहावीच्या परीक्षेतही जिल्ह्यातील १७ हजार २४६ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यातील १६ हजार ९२५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ८ जूनला दहावीच्या निकाला जाहीर झाल्यानंतर या परीक्षेत ११ हजार ९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर ६ हजार २३७ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये याकरिता राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने तत्काळ पुरवणी परीक्षा घेण्याचा निर्णय तीन वर्षापासून अंमलात आणला आहे. यापूर्वी आॅगस्ट-सप्टेंबरमध्ये होणारी पुरवणी परीक्षा यावर्षी जुलै महिन्यात होत आहे. या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश घेता येणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रक माध्यमिक शिक्षण विभागाने यापूर्वीच जाहीर केले आहे. दहावी व बारावीची परीक्षा ही १७ जुलैपासून सुरु होणार असून दहावीची परीक्षा ३० जुलैपर्यंत तर बारावीची परीक्षा ३ आॅगस्टपर्यंत चालणार आहे.१६ परीक्षा केंद्रांवर होणार परीक्षादहावीच्या पुरवणी परीक्षेला ४ हजार ३२६ विद्यार्थी प्रवेशित असून दहा परीक्षा केंद्रावर व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये वर्ध्यातील लोक विद्यालय व न्यू इंग्लिश हायस्कूल येथे परीक्षा केंद्र आहेत. आर्वीत मॉडेल हायस्कूल, आष्टीत हुतात्मा विद्यालय, कारंजा येथे कस्तुरबा विद्यालय, देवळीतील जनता हायस्कूल, पुलगावमध्ये आर.के.हायस्कूल, हिंगणघाटमध्ये भारत विद्यालय, समुद्रपूर विद्या विकास विद्यालय तर सेलूमध्ये यशवंत विद्यालयात परीक्षा केंद्र आहेत.बारावीच्या पुरवणी परीक्षेकरिता ६ परीक्षा केंद्र तयार करण्यात आले असून हे परीक्षा केंं द्र विशेषत: तालुक्याच्या ठिकाणी देण्यात आले आहे. वर्ध्यात जी.एस.कॉमर्स कॉलेज व जानकीदेवी बजाज कॉलेजमध्ये परीक्षा केंंद्र आहेत. देवळीत नगर परिषद कनिष्ठ महाविद्यालय, हिंगणघाटमध्ये रा.सु. बिडकर महाविद्यालय, समुद्रपूरमध्ये विद्या विकास महाविद्यालय तर आर्वी-आष्टी आणि कारंजा या तिन्ही तालुक्यामिळून आर्वीतील नगर परिषद कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. या सहाही परीक्षा कें द्रावरुन २ हजार ३२६ विद्यार्थी पुरवणी परीक्षा देणार आहे.तीन भरारी पथकांची नियुक्तीपरीक्षा सुरळीत पार पडावी याकरिता शिक्षण विभागाकडून तीन भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहेत. यामध्ये माध्यमिकचे शिक्षणाधिकारी, निरंतरचे शिक्षणाधिकारी तसेच डायटचे प्राचार्य यांच्या पथकाचा समावेश आहे.

टॅग्स :examपरीक्षा