शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

सुशीला नायर यांच्या जीवनावर ‘बापू की बेटी’ हा लघुपट

By admin | Updated: December 15, 2014 23:01 IST

१० ते ११ वर्षांपासून मी कस्तुरबा आरोग्य संस्थेत कामानिमित्त येत असते. डॉ. सुशीला नायर ज्यांना सर्वजण आदराने बडी बहणजी म्हणत. त्यांच्या बद्दल संस्थेतील सर्वजण भरभरून बोलतात,

जन्मशताब्दी वर्ष : सेवाग्राम आश्रमात झाले चित्रीकरणदिलीप चव्हाण - सेवाग्राम १० ते ११ वर्षांपासून मी कस्तुरबा आरोग्य संस्थेत कामानिमित्त येत असते. डॉ. सुशीला नायर ज्यांना सर्वजण आदराने बडी बहणजी म्हणत. त्यांच्या बद्दल संस्थेतील सर्वजण भरभरून बोलतात, यामुळे मी सुद्धा विचार करू लागले. खूप ऐकले, वाचायला सुरुवात केली. आणि बडी बहणजी या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची ओळख व्हायला लागली. तरुणी असल्यापासून त्या बापूंच्या सानिध्यात आल्या. पुढे त्यांना बापूंच्या कार्याला आपलं माणत आरोग्य ते स्वातंत्र्य चळवीत खंभीरपणे काम केलं. बापूंच्या सहवासातून स्वातंत्र्यनंतरही त्यांनी आपले कार्य अखंडीत पणे चालू ठेवले. खरोखरच त्या बापूंची बेटी होत्या, म्हणून या लघूपटाला आम्ही ‘बापू की बेटी’ हे नाव दिलं. असे चित्रपट निर्माती वर्षा देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.वर्षा देशपांडे या मुंबईच्या असून त्या स्वत: डॉ. सुशीला नायर यांची महिला अवस्था ते मृत्यूपर्यंतची भूमिका पार पाडणार आहेत. त्यांची आधार समाजसेवी बहुउद्देशिय संस्था (मलकापूर) येथे असून कस्तुरबा आरोग्य संस्था अशा दोन संस्थेंतर्गत हा लघुपट बनविण्यात येत आहे.वर्षा देशपांडे म्हणाल्या, या लघुपटात बहणजीच्या विविध पैलूवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. वास्तविक त्यांचे कार्य अफाट असून विचार, आचारण व बापूंवरील श्रद्धा त्यांनी प्रत्यक्षात साकार केली. बापूंसोबतचे जीवन आणि स्वातंत्र्यनंतरचे त्यांचे जीवन, विचारात तसूभरही पण फरक पडला नाही. ग्रामीण भागातील लोकांना आरोग्य सेवेचे व्रत अखंडपणे चालू ठेवले. आश्रमात त्याचं स्वरूप लहान होते. पण त्यांच्या ज्ञानाचा फायदा व्हावा यासाठी आरोग्याची जबाबदारी गांधीजींनी त्यांच्यावर सोपविली. विशेष म्हणजे त्यात त्या खऱ्या उतरल्या. बापूंच्या शब्दा पलिकडे त्यांच्यासाठी काहीच नव्हते.बहनजींचे मोठे भाऊ प्यारेलाल गांधीजींसोबत होते. लाहोर आताचे पाकिस्तानमधील या ठिकाणी बालवयात बहणजींनी बापूंना पाहिले. पुढे आश्रमातील जीवन १९४२ चे चले जाव आंदोलन आणि बापू यांच्या सोबत २१ महिने आगाखॉ पॅलेसमध्ये राहण्याची संधी मिळाली. स्वातंत्र्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री कस्तूरबा दवाखाना ते महात्मा गांधी आयुर्विज्ञानच्या कार्यातून ग्रामीण क्षेत्रातील कामाचाही समावेश यात आहे.चित्रपटाचे दिग्दर्शन जयंत जीवन करीत असून संगीत मोरेश्वर निस्ताने व मायाताई मोटेगावकर यांनी दिले. मैथलीशरण गुप्ता यांच्या प्रार्थना, श्लोक बापूंचे प्रिय व बहनजींना आवडणाऱ्या भजनांचा यात समावेश करण्यात आला आहे. २६ डिसेंबर हा जन्म दिवस, १०० वर्ष पूर्ण होत असल्याने हा लघुपट समर्पित आहे. संस्थेचे सहकार्य उत्तम असल्याचे वर्षा देशपांडे यांनी सांगितले .