शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

बँक ही जनतेची संपत्ती ती कर्जबुडव्यांना विकू नका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 05:00 IST

तत्कालीन पंतप्रधानांनी १९६९ साली दूरदृष्टी ठेवून बँकांचे राष्ट्रीयीकरण केल्याने समाजातील शेवटच्या घटकाला बँकांची पायरी चढता आली. पण, आता शासनाने धनदांडग्या कर्जबुडव्यांना बँक विकण्याचा घाट रचला आहे. या राष्ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण झाल्यास सर्वसामान्य नागरिकांना बँक व्यवहार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रीयीकृत बँक ही जनतेची संपत्ती आहे. ती कर्जबुडव्यांना विकून खासगीकरण करू नका, अशा मागणीकरिता युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या वतीने दोन दिवसीय संप पुकारला आहे. त्यामुळे आज पहिल्या दिवशीच जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकाच्या शाखा बंद असल्याने व्यवहार प्रभावित झाले.तत्कालीन पंतप्रधानांनी १९६९ साली दूरदृष्टी ठेवून बँकांचे राष्ट्रीयीकरण केल्याने समाजातील शेवटच्या घटकाला बँकांची पायरी चढता आली. पण, आता शासनाने धनदांडग्या कर्जबुडव्यांना बँक विकण्याचा घाट रचला आहे. या राष्ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण झाल्यास सर्वसामान्य नागरिकांना बँक व्यवहार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे खासगीकरणापासून राष्ट्रीयीकृत बँकांना वाचविण्यासाठी युनायटेड फोरम ऑफ बॅक युनियन्सच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांच्या १३१ शाळा १६ आणि १७ डिसेंबरला बंद राहणार आहे. आज पहिल्या दिवशी सर्व शाखा बंद करुन बँक ऑफ इंडिया अधिकारी संघटन विदर्भ युनिटने हातात फलके घेऊन शासनाच्या या खासगीकरणाच्या धोरणाचा निषेध नोंदविला.  दोन दिवस बँकाचा संप राहणार असून शनिवारनंतर रविवारी सुटी आली आहे. त्यामुळे खातेदारांचीही मोठी अडचण होणार असून एटीएममध्येही ठणठणाट होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे.

खासगीकरणाचा काय होणार परिणाम...-   खाते उघडण्याकरिता पाच ते दहा हजार लागणार, लहान खातेदारांना कर्ज मिळीणे कठीण, चार्जेसच्या नावावर ग्राहकांचे शोषण. शेतकऱ्यांना कमी व्याजदारात पीककर्ज मिळणे बंद होऊन सक्तीने वसुली करणार. कर्जावरील व्याजाचा दर खासगी बँका ठरवतील. सरकारी योजना राबविणे कठीण जाणार. अनुदानासाठी खाते उघडणे अडचणीचे ठरतील. खासगी बँक श्रीमंतांना किंवा फायदा असणाऱ्यांनाच सेवा देणार तसेच बँक बुडण्याचेही प्रमाण वाढणार.

राष्ट्रीयीकृत बँकाच्या खासगीकरणाविरोधात युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या वतीने दोन दिवस संप पुकारला आहे. राष्ट्रीयीकृत बँका ही जनतेची संपत्ती आहे. त्यामुळे खासगीकरण थांबवून ती धनदांडग्यांना विकून सर्वसामान्यांचे अहित साधले जाऊ नयेत,अशी आमची मागणी आहे. जिल्ह्यातील १३१ बँक शाखातील कर्मचारी या संपात सहभागी असून, दोन दिवसांत ४०० कोटींचे व्यवहार प्रभावित होणार आहे. या संपानंतरही शासनाने दखल घेतली नाही तर बँक कर्मचाऱ्यांना बेमुदत संप करावा लागेल.- वैभव लहाने, पदाधिकारी, बँक ऑफ इंडिया अधिकारी संघटन विदर्भ युनिट 

 

टॅग्स :bankबँकStrikeसंप