डॉक्टरच्या हलगर्जीने रूग्णाच्या गळ्यातच बँडेज पट्टी

By Admin | Updated: June 20, 2017 01:07 IST2017-06-20T01:07:38+5:302017-06-20T01:07:38+5:30

सेवाग्राम येथील कस्तुरबा रूग्णालयात डॉक्टरच्या हलगर्जीने एका रुग्णाचा जीव धोक्यात आला आहे.

Bamboo bandage band of the doctor's doctor | डॉक्टरच्या हलगर्जीने रूग्णाच्या गळ्यातच बँडेज पट्टी

डॉक्टरच्या हलगर्जीने रूग्णाच्या गळ्यातच बँडेज पट्टी

सेवाग्राम रूग्णालयाचा अफलातून कारभार
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सेवाग्राम येथील कस्तुरबा रूग्णालयात डॉक्टरच्या हलगर्जीने एका रुग्णाचा जीव धोक्यात आला आहे. आॅपरेशन दरम्यान या डॉक्टरच्या हलगर्जीने सुमारे एक फूट लांबीची बँडेज पट्टी रूग्णाच्या गळ्यातच राहिली. यासंदर्भात रूग्णाच्या आईने केलेल्या धावपळीमुळे डॉक्टरांनी आपली चूक पदरात घ्या, असे म्हणत त्या रूग्णाचे पुन्हा आॅपरेशन करून गळ्यातील पट्टी काढली. मात्र या अनागोंदित रूग्णाचा जीव टांगणीला लागला होता.
हा प्रकार घडलेला रूग्ण कुणाल मिश्रा याच्या आईशी संपर्क साधला असता त्यांनी एक घटनेत कुणालच्या नाकाचे हाड तुटल्याचे सांगितले. या उपचाराकरिता त्याला सेवाग्राम रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. या दरम्यान १६ जूनला सकाळी कुणालचे आॅपरेशन करण्यात आले. आॅपरेशननंतर दुपारी कुणालला त्याच्या खाटेवर टाकले असता त्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे निदर्शनास आले. त्याला होश आल्यानंतर तो इशाराने काहीतरी सांगत असल्याचे दिसून आले. याबाबीकडे परिचारिका दुर्लक्ष करित होते. दरम्यान परिचारिकेने अंदाज लावत आॅपरेशन दरम्यान काहीतरी गडबड झाल्याचा संशय डॉक्टरांकडे केला. त्यावरून डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याच्या गळ्यात बँडेज पट्टी असल्याचे दिसून आले. त्यात पुन्हा आॅपरेशन करून पट्टी काढण्यात आली.

विभाग प्रमुखाला ४८ तासात ही माहिती नाही
सेवाग्राम रूग्णालयात नाक, कान, घसा विभागाचे प्रमुख डॉक्टर नागपुरे यांनी शनिवारी झालेल्या या अनागोंदीची विचारणा केली असता याप्रकारात आपल्याला कुठलीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Bamboo bandage band of the doctor's doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.