शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
4
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
5
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
6
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
7
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
9
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
10
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
11
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
12
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
13
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
14
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
15
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
16
रश्मिका मंदानाला विसरा, आता ही साऊथ अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; दुप्पट केलं मानधन
17
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
18
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
19
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
20
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

पर्यावरणाचे संरक्षण करणाऱ्या वृक्षांवर कुऱ्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 5:00 AM

सेवाग्राम येथील मेडिकल चौक परिसरापासून वर्धेकडे जाणाऱ्या मार्गावर दुतर्फा कडूनिंबाची आणि अन्य जातींची मोठी वृक्ष आहेत. गेल्या काही वर्षांपासून ही वृक्ष कुठलाही स्वार्थ न ठेवता मानवासह जिवजंतुंना प्राणवायू देत आहेत. या वृक्षांमुळे या मार्गाच्या सौदर्यातही भर पडली आहे. महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या सेवाग्राम परिसरात त्यांच्या काळापासूनची काही वृक्ष आहेत. त्यांच्या काळानंतरही कार्यकर्त्यांनी काही वृक्ष लावले होते.

ठळक मुद्देविकासाच्या नावावर कत्तल : रस्ते होताहेत ओसाड

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : जग ग्लोबल वार्मिंगच्या विळख्यात असल्याची ओरड होत असतानाच विकासाच्या नावावर मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केली जात आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण करणाऱ्या वृक्षांअभावी रस्ते भकास होत चालल्याचे चित्र वर्धा ते सेवाग्राम मार्गावर पहावयास मिळत आहे.सेवाग्राम येथील मेडिकल चौक परिसरापासून वर्धेकडे जाणाऱ्या मार्गावर दुतर्फा कडूनिंबाची आणि अन्य जातींची मोठी वृक्ष आहेत. गेल्या काही वर्षांपासून ही वृक्ष कुठलाही स्वार्थ न ठेवता मानवासह जिवजंतुंना प्राणवायू देत आहेत. या वृक्षांमुळे या मार्गाच्या सौदर्यातही भर पडली आहे. महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या सेवाग्राम परिसरात त्यांच्या काळापासूनची काही वृक्ष आहेत. त्यांच्या काळानंतरही कार्यकर्त्यांनी काही वृक्ष लावले होते. सेवाग्राम विकास आराखडा मंजूर केल्यानंतर विकासात्मक कामाला गती देण्यात आली. रस्त्यांच्या रुंदिकरणासोबत सौदर्यीकरणाच्या कामाला सुरुवात झाल्याने या मार्गावरील डेरेदार वृक्षांवर कुऱ्हाड पडली. सेवाग्राम आणि बापूंचा आश्रम जगासमोर प्रेरणास्थान आहे. परिसर सुशोभित असणे गरजेचे आहे. पण, प्राणवायू देणाऱ्याआणि पर्यावरणाचे संरक्षण करणाऱ्या वृक्षांची कत्तल होत असल्याने पर्यावरणाची चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे या प्रवृत्तीला आळा घालण्याची मागणी होत आहे.जिल्हा पर्यावरण संरक्षण समितीच्या बैठकीत झाडांना धोका होऊ नये. जी तोडायची असेल त्याची रितसर परवानगी घ्यावी, असा निर्णय घेण्यात आला होता.पण, या मार्गावरील कामात लबाडी केल्याचे दिसून येत आहे. झाडे तोडायची नाही पण, त्यांना मारण्याची उपाययोजना करण्यात आली आहे. बांधकामा दरम्यान झाडांच्या मुळांना धक्का पोहोचविल्याने ती झोड जगणे आता कठीण झाले आहे.-मुरलीधर बेलखोडे, अध्यक्ष निसर्ग सेवा समिती

टॅग्स :forestजंगल