डेंग्यू आजारावर आळा आपल्याच हाती
By Admin | Updated: May 20, 2016 01:55 IST2016-05-20T01:55:58+5:302016-05-20T01:55:58+5:30
डेंग्यू आजारावर आळा घालणे आपल्याच हातात आहे. घरातील वापराचे पाणी ज्या भांड्यात ठेवता, ती भांडी दर आवठवड्यात एकदा...

डेंग्यू आजारावर आळा आपल्याच हाती
वर्धा : डेंग्यू आजारावर आळा घालणे आपल्याच हातात आहे. घरातील वापराचे पाणी ज्या भांड्यात ठेवता, ती भांडी दर आवठवड्यात एकदा धुवून-पूसन कोरडी केल्यास डेंग्यूचा डास तयार होण्यास आळा बसेल. या आजारावर कुठल्याही प्रकारचे औषध नसल्याने आपल्या हातात जे आहे, ते केल्यास आळा बसेल, असे सांगून वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक कोल्हटकर यांनी चिकनगुनिया, हिवताप आदी आजारांवर मार्गदर्शन केले. यावेळी भिडी येथील पायऱ्याच्या विहिरीतील गप्पी मासे महिलांना दाखविण्यात आले.
केंद्र शासनाने १६ मे हा दिवस राष्ट्रीय डेंग्यू दिन म्हणून घोषित केला आहे. दि. १६ ते २० मे पर्यंत गावोगावी डेंग्यूबाबत माहिती देऊन सप्ताह पाळण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दूर्याेधन चव्हाण, हिवताप अधिकारी डॉ. धाकटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर.एम. दिदावत देवळी यांनी केले. यानुसार प्राथमिक आरोग्य केंद गौळतर्फे भिडी येथे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या महिला सभेचे आयोजन आशा स्वयंसेविका सुजाता भगत यांनी केले. अध्यक्षस्थानी ग्रा.पं. सदस्य सुनीता नेहारे तर अतिथी म्हणून नलिनी खोडकुंभे, शोभा शिरभाते, हर्षा वरफडे, ज्योत्सना राऊत, संगीता शिवरकर उपस्थित होते. प्रास्ताविक आरोग्यसेवक दिलीप उटाणे यांनी केले. सहायक अशोक दरणे यांनी डेंग्यूबाबत माहितीपत्रक वाटप केले. संचालन आरोग्यसेवक निलेश साटोणे यांनी केले तर आभार सुजाता भगत यांनी मानले. वनीता दगडे, छबू शिरभाते, लता वरफडे, हिरा दगडे, मनीषा, वर्षा, आशा आणि जया शिरभाते यांच्यासह महिला उपस्थित होत्या.(कार्यालय प्रतिनिधी)