शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

आर्वीतील अवलिया, गरिबांचा अन्नदाता हरविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 05:00 IST

महादेव धुर्वे (७५) असे या अवलियाचे नाव आहे. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा असा आप्तपरिवार आहे. अतिशय साधी राहणी, गोड वाणी हेच त्यांचे धन होते. झोपडीवजा त्यांची खानावळ जय सेवा अखंड भोजनालय असे त्याचे नाव. तीन चुलीवर त्यांचा स्वयंपाक चालू असायचा. त्यांच्या भाकरीची लज्जतच न्यारी होती. दररोज तीनशे भाकरी करायच्या. आर्वी परिसरातील असा एकही व्यक्ती नसेल की ज्यांनी महादेव धुर्वे यांच्याकडे भाकरी घेतलेली नाही.

ठळक मुद्देनगराध्यक्षपदही भूषविले : मृत्यू नागरिकांना लावून गेला चटका, सर्वपक्षीयांनी वाहिली श्रद्धांजली

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : गरीब असो की श्रीमंत, त्यांच्याकडे मध्यरात्रीनंतर अन् केव्हाही कुणीही व्यक्ती गेली तर त्या व्यक्तीला तेवढ्या रात्री पैसे असो अथवा नसो, मनापासून पोटभर जेवण देणारा सामाजिक बांधिलकी जोपासणारा आर्वीचा अन्नदाता हरविला आणि त्यांचा मृत्यू सर्वांनाच चटका लावून गेला.महादेव धुर्वे (७५) असे या अवलियाचे नाव आहे. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा असा आप्तपरिवार आहे. अतिशय साधी राहणी, गोड वाणी हेच त्यांचे धन होते. झोपडीवजा त्यांची खानावळ जय सेवा अखंड भोजनालय असे त्याचे नाव. तीन चुलीवर त्यांचा स्वयंपाक चालू असायचा. त्यांच्या भाकरीची लज्जतच न्यारी होती. दररोज तीनशे भाकरी करायच्या. आर्वी परिसरातील असा एकही व्यक्ती नसेल की ज्यांनी महादेव धुर्वे यांच्याकडे भाकरी घेतलेली नाही.आर्वीत कुणीही आले तर विश्रामगृहावर महादेवजींच्या भाकरी मागवायचे. त्यांनी एका परप्रांतीय महिलेसह एका मतिमंद महिलेच्या मुलीला दत्तक घेतले होते. तिचा सांभाळ करीत शिकविले. चार-पाच वर्षांपूर्वीच विवाह करून दिला. एका अनाथ मुलालाही त्यांनी शिकवले, मोठे केले. तो आता नोकरीत आहे.नगराध्यक्षपक्षाचा कधीच गैरवापर केला नाही. साधी राहणी उच्च विचारसरणी त्यांची होती. आदिवासी समाजातील ते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते होते. स्व. व्यंकटेश आत्राम यांचे ते अत्यंत जवळचे सहकारी होते. आर्वी शहरातच नव्हे, तर संपूर्ण विदर्भात ३८ वर्षांपासून अखंड शहीद स्वातंत्र्यवीर गोंड महाराज शंकरशहा मडावी, रघुनाथ शहा मडावी, पिता-पुत्राचा बलिदान दिन साजरा करणारे असे ते व्यक्तिमत्त्व होते. पोलीस ठाण्यात खुराक त्यांच्याचकडून जायची.अशा या अन्नदात्यास काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, पीरिपा, गोंडवाना एकता परिषद, भोलेश्वर आदिवासी बहुउद्देशीय संस्था, महाराणी हिराई आदिवासी बचत गट, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, नगरपालिकेचे पदाधिकारी-कर्मचारी, सर्व सामाजिक संघटना, डॉक्टर, व्यापारी, आर्वी तालुका प्रेस क्लब, पत्रकार समिती, पोलीस विभाग संघटना आदींनी श्रद्धांजली अर्पण केली. 

टॅग्स :Deathमृत्यू