शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
4
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
5
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
6
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
7
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
8
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
9
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
10
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
11
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
12
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
13
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
14
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा
15
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
16
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
17
शुबमन गिलचा एक मेसेज अन् तो सासरवाडीतून थेट टीम इंडियाच्या ताफ्यात (VIDEO)
18
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Wimbledon 2025 : नोव्हाक जोकोविच विक्रमी २५ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा डाव साधणार का?
20
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर

गौण खनिजासह चोरट्यांचे रेतीवर लक्ष

By admin | Updated: December 11, 2014 23:11 IST

आष्टी तालुक्यातील काही शिवारात गत काही महिन्यापासून मुरूमाचे मोठ्या प्रमाणात जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम केले जात आहे़ या गंभीर प्रकाराकडे महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे़

तळेगाव (श्या़पं़) : आष्टी तालुक्यातील काही शिवारात गत काही महिन्यापासून मुरूमाचे मोठ्या प्रमाणात जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम केले जात आहे़ या गंभीर प्रकाराकडे महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे़ या गौण खनिजच्या चोरीला महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांचा अप्रत्यक्ष आशीर्वाद असल्याचा आरोप नागरिकांद्वारे केला जात आहे़ आष्टी तालुक्यातील तळेगाव, भारसवाडा, अंतोरा, धाडी, बांबर्डा, थार गावांच्या शिवारात अवैधरित्या मुरूमाचे खोदकाम करून मुरूम चोरीला जात असल्याची माहिती ग्रामस्थ देत आहे. काही शिवारात असलेल्या टेकड्यावर जेसीबीच्या मदतीने खोदकाम केले जात असल्याचे प्रत्यक्ष पाहणीदरम्यान निदर्शनास आले़ या ठिकाणी रात्री ९ वाजतानंतर मुरूमाच्या खोदकामाला सुरुवात केली जात आहे. हे उत्खनन पहाटे ५ वाजेपर्यंत अव्याहतपणे सुरू राहत असल्याची माहिती परिसरातील नागरिक देत आहेत. खोदकाम करण्यात आलेला मुरूम येथून रात्रभरात ट्रक, ट्रॅक्टरने बाहेर ठिकाणी नेला जातो़ हा संपूर्ण प्रकार काही स्थानिक तरुणांनी महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत खोदकाम करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली़ मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी या मागणीकडे लक्ष दिले नसल्याचा आरोप होत आहे. महसूल विभागातील या गौण खनिजाच्या खोदकामाकडे लक्ष देत नसून कुठलीही कारवाई करीत नाही़ आष्टी तालुक्यात तळेगाव, भारसवाडा, अंतोरा, धाडी, बांबर्डा, थार आदी गावशिवारात टेकड्यांची बहूलता आहे. तसेच या टेकड्यांवरील मुरूमही अतिशय चांगल्या दर्जाचा असल्याने परिसरात त्याची मोठी मागणी आहे. हीच बाब हेरून परिसरात गौनखनिज चोरटे सक्रीय झाले असून रात्रीच्या वेळी चक्क जेसीबीच्या सहाय्याने अविधरित्या मुरुमाचे अखंद उत्खनन केले जात आहे. या कारणाने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. तरीही शासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने गौण खनिजच्या चोरीला महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांचा अप्रत्यक्ष आशीर्वाद तर नसावा असा संशय नागरिक व्यक्त करीत आहे. जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम होत असूनही कारवाई नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.(वार्ताहर)