पोलिसांवर हल्ला; १२ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 06:00 IST2019-09-02T06:00:00+5:302019-09-02T06:00:11+5:30
गावात फेरफटका मारला असता काही लोक जुगार खेळताना आढळून आले. त्यामुळे त्यांनी त्या जुगार खेळणाऱ्याला हटकल्याने जुगार खेळणाऱ्यांनी बाचाबाची केली. याचे रुपांतर मारहाणीत होऊन जुगार खेळणाऱ्यांनी काठी व गोट्यांनी हल्ला चढविला. यात मारोती सिडाम यांच्या डोक्याला जबर मार लागला. तसेच मनिष राठोडही जखमी झाला.

पोलिसांवर हल्ला; १२ जणांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : तालुक्यातील वडगाव येथे पोळ्याच्या बंदोबस्ताकरिता गेलेल्या मनीष राठोड व मारोती सिडाम या दोन पोलीस शिपायांनी जुगार खेळणाऱ्यांना हटकले. त्यामुळे जुगाऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवून जखमी केले. याप्रकरणी पोलिसांनी १२ जणांना अटक केली असून त्यांना सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
वडगाव या गावात शांततेत पोळा पार पडावा म्हणून जमादार मारोती सिडाम व शिपाई मनिष राठोड यांची ड्यूटी लावण्यात आली होती. त्यांनी गावात फेरफटका मारला असता काही लोक जुगार खेळताना आढळून आले. त्यामुळे त्यांनी त्या जुगार खेळणाऱ्याला हटकल्याने जुगार खेळणाऱ्यांनी बाचाबाची केली. याचे रुपांतर मारहाणीत होऊन जुगार खेळणाऱ्यांनी काठी व गोट्यांनी हल्ला चढविला. यात मारोती सिडाम यांच्या डोक्याला जबर मार लागला. तसेच मनिष राठोडही जखमी झाला.
याप्रकरणी आरोपींनी दोन्ही शिपायांना लाथाबुक्क्यांनी मारहाण व शिविगाळ करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तसेच जीवघेणा हल्ला चढविला, अशी तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी अरूण श्रीराम काळे, प्रमोद उत्तमराव पांडे, पवन विजय पांडे, गणेश जानराव केवट, दिनेश नामदेव मेश्राम, रामेश्वर सुरेश मेश्राम, गजानन काशिनाथ मारबते, रामभाऊ गोविंद मारबते, सूरज अशोक केवट, विजय एकनाथ पांडे, सदाशिव केवट व राजेंद्र मारबते या बारा जणांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
या प्रकरणात आणखीही आरोपी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पुढील तपास ठाणेदार संपत चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गोपाल ढोले करीत आहेत.