शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक डबघाईत अडकलेली आष्टी नगरपंचायत; आर्थिक दिवाळखोरीमुळे शहर संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 18:53 IST

आष्टीच्या नगरपंचायतीतील असाही सावळागोंधळ : धनादेश वटलेच जात नाहीत, आर्थिक डबघाईस आल्याची येते प्रचिती

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : नगरपंचायतचा कारभार म्हणजे 'नाचता येईना अंगण वाकडे' असाच झाला आहे. नगरपंचायतच्या खात्यात पैसे नाहीत. मात्र, विविध बाबींवर करण्यात येणाऱ्या खर्चापोटी धनादेश दिले जात आहेत. ते धनादेश बैंकेतून वटले जात नाहीत. त्यामुळे नगरपंचायत आर्थिक डबघाईस आल्याने नगरपंचायतला कधीही उधारीवर साहित्य द्यायला तयार नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

आष्टी नगरपंचायतच्या हद्दीमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात विविध करापोटी वसुली केली जाते. ज्या सुविधा नगरपंचायत देत नाही त्याचाही कर जबरदस्तीने वसूल केला जात आहे. आष्टी शहरात प्रचंड अतिक्रमण वाढले, ते अतिक्रमण काढण्यास नगरपंचायत असमर्थ ठरली आहे. विकासाचे कुठलेही काम होताना दिसत नाही. थोडेफार शासनाकडून काम मंजूर झाले. त्यातही ५६ लाखांच्या निविदा मॅनेज झाल्याचा आरोप खुद्द सत्ताधारी नगरपंचायतच्या उपाध्यक्षांनीच केल्यामुळे न्याय मागायचा कुणाकडे, हा प्रश्नसुद्धा उपस्थित झाला आहे. नगरपंचायतकडून कुठल्याच सोयी-सुविधा नागरिकांना मिळत नाहीत.

अनेक प्रभागांमध्ये लाइट बंद आहे. नाल्या भरलेल्या असून साथीचे आजार झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे साहित्य खरेदी, विहिरीमध्ये ब्लिचिंग पावडर टाकणे हे काम गेल्या अनेक महिन्यांपासून ठप्प आहे. नगरपंचायतकडे निधी नसल्यामुळे कोणीही उधारीत साहित्य देण्यास तयार नाही. त्यातच नगरपंचायतचे लेखापाल, नवीन आलेले मुख्याधिकारी यांना पहिलीच वेळ असल्यामुळे पाहिजे तसे प्रशासन चालविण्याचे कौशल्य दिसत नाही. त्यामुळे दररोज काही ना काही उलथापालथीच्या घडामोडी सुरू आहेत. 

धनादेश लिहितानाही चुकांचा भडिमारलेखापाल हे धनादेश लिहिताना कधी इंग्रजी तर कधी मराठी या दोन्ही भाषांचा वापर करून त्रोटक पद्धतीने धनादेश तयार करतात आणि खात्यामध्ये पैसेसुद्धा राहत नाहीत. हे धनादेश बैंकेत टाकल्यावर ते वटतच नाहीत. त्यानंतर संबंधित खरेदीदार नगरपंचायतला विचारणा करतात. लेखापाल त्यांना उडवाउडवीची उत्तरे देतो. अशा भोंगळ कारभाराची दखल घेत अधिकाऱ्यांवर वरिष्ठांनी तातडीने कारवाई करणे अपेक्षित आहे. मुख्याधिकारीही पाहतो, बघतो अशी भाषा वापरून वेळ मारून नेत असल्याने रोष व्यक्त होत आहे.

सत्तारुढ होण्यासाठी पाठिंबा देणारे सत्तेतून पडले बाहेरकाँग्रेस आणि जनशक्ती संघटनेने मिळून ही नगरपंचायत सत्तारूढ झाली होती. मात्र गेल्या काही महिन्यांआधी जनशक्ती संघटनेने आपला पाठिंबा काढून घेतला. त्यांनी असा आरोप केला की, नगरपंचायत आष्टी हे जनतेचे विकासकाम करण्यात असमर्थ ठरली आहे. त्यातच आता नगरपंचायतजवळ पैसे नसल्यामुळे संपूर्णपणे आर्थिक डबघाईस आलेली नगरपंचायत असे चित्र पाहायला मिळत आहे.

आर्थिक स्थिती नाजूक, मिळणाऱ्या निधीवर काम "नगरपंचायत आष्टीची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. मालमत्ता आणि पाणीपट्टी करापोटी तसेच विविध करांपोटी जेवढी वसुली होईल, तेवढ्यावर भागविणे सुरू आहे. मागणी केल्याप्रमाणे धनादेश दिला जातो. खात्यात पैसे कमी असल्यामुळे धनादेश वटला नाही तर खात्यामध्ये पैसे टाकून पुन्हा दुसरा धनादेश द्यायला सांगतो."- अक्षय गडलिंग, मुख्याधिकारी, नगरपंचायत आष्टी (शहीद).

टॅग्स :wardha-acवर्धाashti-acआष्टी