शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

आर्वीत सार्वजनिक उद्यानाची वाणवा

By admin | Updated: May 31, 2014 23:41 IST

ज्येष्ठांना सायंकाळी बसण्याकरिता तर चिमुकल्यांना बागडण्याकरिता तर शहराचे सौंदर्य वाढविण्याकरिता शहरात मोठे उद्यान असावे असे अनेकांचे म्हणणे आहे. यानुसार आर्वीत उद्यानाची निर्मितीही झाली

सुरेंद्र डाफ - आर्वीज्येष्ठांना सायंकाळी बसण्याकरिता तर चिमुकल्यांना बागडण्याकरिता तर शहराचे सौंदर्य वाढविण्याकरिता शहरात मोठे उद्यान असावे असे अनेकांचे म्हणणे आहे. यानुसार आर्वीत उद्यानाची निर्मितीही झाली मात्र त्यांच्या देखरेखीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे या उद्यानात आता कचर्‍याचे अंबार लागले आहेत.  याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत असल्याची ओरड होत आहे. पालिकेच्या अधिकार क्षेत्रात येत असलेल्या उद्यानाची दुरूस्ती करण्याची मागणी आर्वी येथील नारिकांकडून करण्यात येत आाहे.४५ हजारांच्यावर लोकसंख्या असलेले हे शहर आहे. शिवाय आर्वी, आष्टी, कारंजा या तिनही तालुक्याच्या उपविभागाचे हे शहर आहे. असे असतानाही या शहरात वृद्ध व बालकांना हक्काचे हवे असणारे एकही सार्वजनिक उद्यान नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत सायंकाळी खेळण्याकरिता आर्वीत वयोवृद्धासाठी अनामिका सार्वजनिक उद्यान गत तीन-चार वर्षांपासून खंडर झाले आहे. हे अद्यान आता अवैध व्यवसायाचे केंद्र बनले आहे.आर्वी शहर हे उपविभागाचे शहर म्हणून तालुक्यात परिचित आहे. आर्वी न.प.च्या अखत्यारीतील एकमेव अनामिका हे उद्यान आहे. हे लहान बालक व वृद्धांचे सायंकाळी बसण्याचे हक्काचे ठिकाण म्हणून ओळखल्या जात होते. येथे असणार्‍या खेळाच्या साहित्यावर लहान मुल बागडायचे. वृद्धांनाही सायंकाळी बसण्याकरिता हक्काचे ठिकाणी म्हणून निवांत बसण्याची व्यवस्था व्हायची; परंतु गत चार वर्षात आर्वीच्या एकमेव असणार्‍या सार्वजनिक अनामिका उद्यानाला सध्या उकिरड्याचे स्वरूप आले आहे.सध्या नगर परिषदेत भाजपाची बहुमतात सत्ता आहे. गत तीन वर्षांपासून अनामिका उद्यानाच्या सौंदर्यीकरणाचा प्रश्न सुटला नाही. यामुळे आर्वीतील वृद्ध, बालकांना अजूनही बागडण्याकरिता व सायंकाळच्यावेळी बसण्याकरिता हक्काच्या जागेपासून वंचित राहावे लागत आहे.मध्यवस्तीत व तहसील कार्यालयासमोर असणार्‍या या अनामिका उद्यानाची अवस्था सध्या दयनीय झाली आहे. या जागेवर सध्या ठिकठिकाणी उकिरडे व कचर्‍याचे ढिग साचले आहेत. आर्वी शहराच्या मध्यवस्तीत असणारे व सध्या अडगळीत पडलेल्या अनामिका उद्यानाला पूर्वीचे वैभव पुन्हा कधी येणार का, असा सवाल सध्या आर्वीकर करीत आहेत. आर्वी पालिकेच्या सभेत या अनामिका उद्यानाच्या गत वैभवावर सत्ताधारी व विरोधी न. प. सदस्य पुढाकर घेत त्याच्या दुरुस्तीकरिता प्रयत्न करणार काय, असा सवाल आर्वीकरांचा आहे.