महागड्या कारने येत जबरी रोकड पळविणारे अखेर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2022 05:00 IST2022-03-23T05:00:00+5:302022-03-23T05:00:17+5:30

राजू रवी राऊत हे एम. एच. ३६ ए. ए. १९८५ क्रमांकाच्या मालवाहूने नियोजित ठिकाणी पाच बैल घेऊन जात होते. मालवाहू जाम चौरस्ता परिसरात आला असता मागाहून आलेल्या कारमधील काही व्यक्तींनी मालवाहू थांबवून वाहनातील चालक व क्लिनरला मारहाण केली. इतकेच नव्हे तर धाकदपट करीत त्यांच्या जवळील ८ हजार रुपये हिस्कावून घेतले. आरोपी इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी बैल व मालवाहू हवा असेल तर बैल मालकास तातडीने ऑनलाईन पैसे पाठवायला सांगण्याचे सांगितले.

Arrested for stealing cash from an expensive car | महागड्या कारने येत जबरी रोकड पळविणारे अखेर जेरबंद

महागड्या कारने येत जबरी रोकड पळविणारे अखेर जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : महागड्या कारने येत गोवंशाची वाहतूक करणाऱ्या मालवाहूला अडवून मारहाण करीत जबरी रोकड पळविणाऱ्या त्रि-सदसीय चोरट्यांच्या टोळीला समुद्रपूर पोलिसांनी अटक केली आहे. गोलू ऊर्फ शैलेश बहादूर राणा, श्रीकांत रमेश हेडाऊ व अमरदीप ऊर्फ बॉब अरुण जीवने सर्व रा. हिंगणघाट अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
राजू रवी राऊत हे एम. एच. ३६ ए. ए. १९८५ क्रमांकाच्या मालवाहूने नियोजित ठिकाणी पाच बैल घेऊन जात होते. मालवाहू जाम चौरस्ता परिसरात आला असता मागाहून आलेल्या कारमधील काही व्यक्तींनी मालवाहू थांबवून वाहनातील चालक व क्लिनरला मारहाण केली. इतकेच नव्हे तर धाकदपट करीत त्यांच्या जवळील ८ हजार रुपये हिस्कावून घेतले. आरोपी इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी बैल व मालवाहू हवा असेल तर बैल मालकास तातडीने ऑनलाईन पैसे पाठवायला सांगण्याचे सांगितले. घाबरलेल्या मालवाहू चालकाने बैल मालकास माहिती दिल्यावर ऑनलाईन पद्धतीने आरोपीस १७ हजार रुपये देण्यात आले. आरोपींच्या तावडीतून कशीबसी सुटका झाल्यावर राजू राऊत याने समुद्रपूर पोलीस स्टेशन गाठून तक्रार नाेंदविली. 
तक्रारीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेत तपासाला गती देत अवघ्या काही तासांतच या चोरट्यांना हुडकून काढत अटक केली. चोरट्यांकडून पोलिसांनी एम. एच. १८ ए. जे. ९७९७ क्रमांकाची महागडी कारही जप्त केली आहे. ही कारवाई ठाणेदार प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक पंकज मसराम, पोलीस अंमलदार अरविंद येनुरकर, विक्की मस्के, रवी पुरोहित, वैभव चरडे यांनी केली.
 

Web Title: Arrested for stealing cash from an expensive car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.