साडेपाच हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांची फौज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 06:00 IST2019-09-24T06:00:00+5:302019-09-24T06:00:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे. तर सोबतच निवडणूक ...

An army of five and a half thousand officers and staff | साडेपाच हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांची फौज

साडेपाच हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांची फौज

ठळक मुद्देपोलिंग स्टाफची आकेडवारी : सर्वाधिक स्टाफ लागणार गोंदिया मतदार संघात

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे. तर सोबतच निवडणूक निर्विघ्न्न पार पडली पाहिजे यासाठी प्रशासनाचीही दमछाक होत असल्याचे दिसत आहे. मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पडली पाहिजे, यासाठी प्रशासनाने पाच हजार ६३६ अधिकारी-कर्मचाऱ्यांची पोलिंग स्टाफ म्हणून फौज उभी केली आहे. यातील सर्वाधिक एक हजार ५८४ अधिकारी-कर्मचारी गोंदिया विधानसभा मतदार संघात लागणार आहेत.
निवडणूक आयोगाने मुहूर्त काढून विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताच निवडणुकीला रंगत चढू लागली आहे. पुढील ३ दिवसांनंतर नामांकन अर्ज भरण्यास सुरूवात होणार असल्याचे आता उमेदवारांच्या नावांना घेऊन सर्वत्र चर्चा सुरू झाल्या आहेत. यामुळे आता इच्छुकांचे टेंशन वाढले असून त्यांची आपापल्या क्षेत्रात धावपळ व भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. सर्वांच्या नजरा २१ व २४ तारखेवर लागल्या असून विजयाची माळ कुणाच्या गळ््यात याचीच उत्कंठा दिसून येत आहे.
हे सर्व सुरू असताना मात्र विधानसभा निवडणूक निर्विघ्नपणे पार पाडावी यासाठी प्रशासन रात्रंदिवस एक करीत आहे. जिल्ह्यात चार विधानसभा मतदार संघात निवडणूक घेतली जाणार असून एक हजार २८१ व एक सहाय्यकारी मतदान केंद्र ठेवण्यात आले आहे. या केद्रांचे कामकाज सुरळीत व्हावे यासाठी प्रशासनाने पाच हजार ६३६ अधिकारी-कर्मचाऱ्यांची फौज उभी केली आहे. हे अधिकारी-कर्मचारी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरील कामकाज सांभाळणार असून या पोलींग स्टाफच्या भरवशावरच विधानसभेची निवडणूक यशस्वीरित्या पार पाडली जाणार आहे. यात अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदार संघात ३१६ मतदान केंद्र राहणार असून यासाठी एक हजार ३९०, तिरोडा विधानसभा मतदार संघात २९५ मतदार केंद्र राहणार असून एक हजार २९८, गोंदिया विधानसभा मतदार संघात ३६०+१ मतदान केंद्र राहणार असून एक हजार ५८४ तर आमगाव विधानसभा मतदार संघात ३१० मतदान केंद्र राहणार असून एक हजार ३६४ अधिकारी-कर्मचाºयांचा पोलींग स्टाफ राहणार आहे. अशाप्रकारे जिल्ह्यातील १२८१+१ मतदान केंद्रांसाठी एकूण पाच हजार ६३६ अधिकारी-कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.

मतदानासाठी साहित्य उपलब्ध
जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडे मतदान साहित्य उपलब्ध झाले आहे. यात एक हजार ७०४ कंट्रोल युनिट, दोन हजार ३८९ बॅलेट तसेच एक हजार ७०८ व्हीव्हीपॅट आहेत. मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनाक डून सर्वच साहित्यांची तपासणी करण्यात आली आहे.

Web Title: An army of five and a half thousand officers and staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.