धंतोली येथील आरामशीनला आग; सागवानासह लाकूड जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 08:47 IST2020-04-09T08:47:16+5:302020-04-09T08:47:29+5:30

धंतोली परिसरात शब्बीर आली सय्यद यांची आरामशीन आहे.  

Aramashin fire at Dantoli; Burn wood with saagavan | धंतोली येथील आरामशीनला आग; सागवानासह लाकूड जळून खाक

धंतोली येथील आरामशीनला आग; सागवानासह लाकूड जळून खाक

वर्धा : धंतोली येथील लाकडाच्या आरामशीनला आग लागून संपूर्ण लाकूडफाटा जळून खाक झाला.  ही घटना गुरुवारी पहाटे 4 वाजताच्या सुमारास घडली. 

धंतोली परिसरात शब्बीर आली सय्यद यांची आरामशीन आहे.  त्यांच्या आरामशीनमध्ये कोटी रुपयांच्या सागवानासह इतर लाकूड होते. आज पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास शॉटरसर्किट ने आग लागली.  बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत संपूर्ण लाकूड जळून खाक झाले अग्निशामक बंबाच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.  अंदाजे 1 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आरामशीन मालक शब्बीर अली सय्यद यांनी वर्तविला आहे.

Web Title: Aramashin fire at Dantoli; Burn wood with saagavan

टॅग्स :fireआग