शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
4
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
5
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
6
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
7
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
9
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
10
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
11
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
12
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
13
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
14
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
15
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
16
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
17
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
18
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
19
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
20
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
Daily Top 2Weekly Top 5

शिकाऊ अभियंत्यांनी बनविले साईच्या नऊ गुरुवार व्रतावर अ‍ॅप

By admin | Updated: November 18, 2014 23:00 IST

अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच काही वेगळं करायचं असा ध्यास असलेले काही मित्र मैत्रिणी एकत्र आले आहेत. अनेक उपक्रम राबवून आपली सामाजिक जाणीव जागृत ठेवण्यासाठी त्यांनी ‘रास’ या ग्रुपची

वर्धेतील पहिलाच प्रयत्न : हिंदी भाषेत सहज सोपे आणि सुटसुटीतपराग मगर - वर्धाअभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच काही वेगळं करायचं असा ध्यास असलेले काही मित्र मैत्रिणी एकत्र आले आहेत. अनेक उपक्रम राबवून आपली सामाजिक जाणीव जागृत ठेवण्यासाठी त्यांनी ‘रास’ या ग्रुपची निर्मिती केली. आपल्या शिक्षणाचा लोकांसाठी उपयोग व्हावा ही इच्छा मनात घर करून होती. त्यातच सगळ्यांची साईवर निस्सिम श्रद्धा. त्यामुळे अँंड्रॉईड मोबाईल अ‍ॅप बनविण्याचे प्रशिक्षण घेतानाच साईभक्तांसाठी काहीतरी वेगळे करण्याचा ध्यास घेत अवघ्या पंधरा दिवसांत ‘साई भक्ती: ९ गुरुवार व्रत’ हे अ‍ॅप तयार करून वर्धेच्या साईमंदिरात साईला अर्पण केले. अ‍ॅप बनविण्याचा वर्धेतील हा पहिलाच प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.तंत्रज्ञान जगाला सावरू लागले आहे. त्यामुळे त्याचाच उपयोग करून आपणही जगाला काहीसं सावरावं या उद्देशांने संपूर्ण युवा पिढी तंत्रज्ञानाची कास धरत आहेत. हिच कास धरत वर्धा जिल्ह्यात एका अभियांत्रिकी महाविद्यालयातचे शिक्षण घेत असलेल्या सत्यम गुर्वे, विपीन पाटील, नितीन डवाले, अनघा वैद्य, पूजा इंदोरिया, अपूर्वा वाघमारे, मनीषा रिठे, वैभव इरुटकर, प्रणिता सुरकार या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन रास (रॉकस्टार अ‍ॅप्स अ‍ॅन्ड सॉफ्टवेअर सोल्यूशन) हा ग्रूप तयार करीत सामाजिक उपक्रम सुरू केले. शिक्षण पूर्ण होताच त्यांनी थेट हैदराबाद गाठून अ‍ॅप्स बनविण्याचे प्रशिक्षण पूर्ण केले. सत्यम हा त्यांचा लिडर असे म्हणता येईल. साईवर श्रद्धा असल्याने न चुकता दर गुरुवारी हा ग्रूप वर्धेतील साई मंदिरात यायचा. त्यामुळे आपण घेत असलेल्या शिक्षणाचा साईभक्तांसाठी काही तरी उपयोग व्हावा या विचारातून ‘साई भक्ती: ९ गुरुवार व्रत’ या अ‍ॅपची संकल्पना सुचली. याआधी त्यांनी साईबाबा संदर्भात कुठले अ‍ॅप्स आहेत याचा तपास केला असता व्रतांसंदर्भात कुठलेही अ‍ॅप्स नसल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी यावर काम सुरू केले. काहीच दिवसांपूर्वी साई मंदिरात या अ‍ॅपचे लाँचिंग करण्यात आले. याचा लाभ जिल्ह्यातील साईभक्तांना होईन, असे हा अ‍ॅप्स तयार करणाऱ्या भावी अभियंत्यांचे म्हणणे आहे.