कत्तलीसाठी केरळला नेली जात होती जनावरे; पोलिसांनी उधळला डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2022 05:00 IST2022-04-06T05:00:00+5:302022-04-06T05:00:06+5:30
धडक कारवाई मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास नागपूर-हैदराबाद मार्गावरील दारोडा टोल नाका परिसरात करण्यात आली. गोपनीय माहिती मिळताच वडनेर पोलिसांनी हैदराबाद मार्गावरील दारोडा शिवारात नाकाबंदी करून काही वाहनांची पाहणी केली. दरम्यान, नागपूरकडून हैदराबादच्या दिशेने जात असलेल्या कंटेनरला थांबवून पाहणी केली असता त्यात निर्दयतेने कोंबलेल्या अवस्थेत मोठ्या संख्येने जनावरे आढळून आली.

कत्तलीसाठी केरळला नेली जात होती जनावरे; पोलिसांनी उधळला डाव
लोकमत न्यूज नेटवर्क
वडनेर : जनावरांना कंटेनरमध्ये निर्दयतेने कोंबून त्यांना कत्तलीसाठी केरळ राज्यात नेले जात होते; पण वडनेर पोलिसांनी सदर माहिती मिळताच नागपूर-हैदराबाद मार्गावर नाकेबंदी करीत धडक कारवाई करून जनावर तस्करांचा हा डावच उधळून लावला. पाेलिसांनी या कारवाईत एकूण २० जनावरे, तसेच जनावरांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारा कंटेनर जप्त केला आहे. ही धडक कारवाई मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास नागपूर-हैदराबाद मार्गावरील दारोडा टोल नाका परिसरात करण्यात आली. गोपनीय माहिती मिळताच वडनेर पोलिसांनी हैदराबाद मार्गावरील दारोडा शिवारात नाकाबंदी करून काही वाहनांची पाहणी केली. दरम्यान, नागपूरकडून हैदराबादच्या दिशेने जात असलेल्या कंटेनरला थांबवून पाहणी केली असता त्यात निर्दयतेने कोंबलेल्या अवस्थेत मोठ्या संख्येने जनावरे आढळून आली. पोलिसांनी जनावरे वाहतुकीसंदर्भात कंटेनर चालकासह वाहनातील व्यक्तीना विचारणा केली असता त्यांच्याकडे कुठलीही परवानगी नव्हती. त्यानंतर पोलिसांनी साहीद सहजाद खान, बिलाल अहमद अब्दुल गप्पार कुरेशी, मुबारक गफूर खान, तसेच आरीफ युसूफ कुरेशी आणि समशान बशीर अहमद यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून जनावरांची अवैध वाहतूक करण्यासाठी वापरलेला कंटेनर आणि कंटेनरमधील २० जनावरे जप्त करण्यात आली. अधिकची माहिती पोलिसांनी जाणून घेतली असता ही जनावरे अवैधरीत्या कत्तलीसाठी पालघाट केरळ येथे नेली जात असल्याचे पुढे आले. ही कारवाई ठाणेदार राजेंद्र शेटे यांच्या मार्गदर्शनात अमित नाईक, सचिन सूरकार, निखिल कोरडे, शुभम पोहाणे यांनी केली.