शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

अन् नगराध्यक्षाला ‘गेट आऊट’ म्हणत हाकलले

By admin | Updated: July 8, 2017 00:13 IST

येथील नगराध्यक्ष शीला सोनारे यांचा मुलगा चेतन सोनारे हा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क समुद्रपूर : येथील नगराध्यक्ष शीला सोनारे यांचा मुलगा चेतन सोनारे हा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे. नगराध्यक्ष त्याच्या उपचाराबाबत विचारणा करायला गेल्या असता येथील वैद्यकीय अधिकाऱ्याने त्यांना थेट ‘गेट आऊट’ म्हणून हाकलले. वैद्यकीय अधिकाऱ्याच्या उर्मटपणामुळे नागरिकांत संताप व्यक्त होत होता. शिला सोनारे यांच्या मुलाला गॅस्ट्रोची लागण झाल्याने गुरुवारी त्याला रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्यावर झालेल्या उपचाराबाबत शुक्रवारी सायंकाळी सेवेवर असलेले डॉ. वांदिले यांच्याकडे विचारणा करण्याकरिता सोनारे गेल्या. रुग्णाच्या प्रकृतीबाबत विचारणा सुरू असताना डॉक्टरांनी रुग्णाला त्यांच्या जवळ आणण्याचा सल्ला दिला. यावर नगराध्यक्षांनी त्याला चक्कर येत असल्याचे सांगितले. यातही त्यांनी रुग्णाला डॉक्टराजवळ आणले. डॉक्टरांनी रुग्णाची तपासणी करण्याकडे दुर्लक्ष केले. तेव्हा पुन्हा अध्यक्षांनी विनंती केली. यावर डॉक्टरांनी त्यांना थेट ‘गेट आऊट’ म्हणत हाकलून लावत आपल्या उर्मटपणाचा परिचय दिला. याची माहिती गावात पोहोचताच काही नागरिक संतप्त झाले. या नागरिकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांना पोलिसात देण्याची तंबी दिली. सदर ग्रामीण रुग्णालयावर कुणाचाही वचक नसल्याने रुग्णालयामध्ये असे प्रकार नेहमीचेच आहे. शेवटी लोकप्रतिनिधीलाच या प्रकाराला सामोरे जावे लागल्याने खळबळ निर्माण झाली आहे. सदर बाबीची माहिती आमदार समीर कुणावार यांना दुरध्वनीवरून देण्यात आली. त्यांनी त्वरीत चौकशीचे आदेश दिले आहे. दवाखान्यात भरती असलेल्या पेशंट व नातेवाईकांनी सुद्धा अनेक तक्रारी केल्या. येथे उपचार घेत असलेल्या भरती सोनु बारई नामक रुग्णाने त्याची व्यथा व्यक्त केली. त्यांना गुरुवारपासून एकच सलाईन लावल्याची माहिती त्यांनी दिली. याची माहिती देण्याकरिता डॉक्टरांकडे गेल्यास ते ओरडतात, असेही त्या म्हणाल्या. हिच कैफियत भरती पेशंट रेखा चाफले, वनिता गुडवार यांनी ऐकविली. मी वॉर्डमधून पेशंटला घेवून या म्हटले. ते पेशंटला घेवून आले; मात्र त्यावेळस दुसऱ्या पेशंटला तपासत असल्याने वेळ झाला. मी पेशंट ओळखतो, मला नगराध्यक्षाचे काही घेणे देणे नाही. -डॉ. शैलश वांदिले, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय समुद्रपूर.