शहरं
Join us  
Trending Stories
1
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
4
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
5
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
6
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
7
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
8
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
9
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
10
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
11
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
12
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
13
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
14
पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
15
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
16
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
17
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
18
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
19
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
20
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरांना अभिप्रेत समाज परिवर्तन करण्यात कमी पडलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 05:00 IST

पुलगाव येथील बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पब्लिक स्कूल येथे पार पडलेल्या फेस्टीवलमध्ये ते बोलत होते. या फेस्टीवलचे उदघाटन समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष इंजिनियर विजय मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बालरोगतज्ज्ञ डॉ. सचिन बागडे, चंद्रसेन डोंगरे, डॉ. सुभाष खंडारे, राजरत्न कुंभारे, भारत रंगारी, राजकुमार बेलसरे, किशोर येसनकार, देवानंद गायगवळी, सरपंच वनिता शिंगणापुरे, वहिदा शेख उपस्थित होते.

ठळक मुद्देसोहनलाल गिंडा : पुलगावात बुद्धिस्ट फेस्टिव्हल

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : शिका, संघटित व्हा आणि जातीभेद, विषमतेची दरी बुजवून अंधश्रद्धा अज्ञानातून बाहेर पडून अखंड भारत तयार होण्याचा विचार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला असला तरी यांना अभिप्रेत असलेले समाजपरिवर्तन करण्यास आपण कमी पडलो आहे, अशी खंत बुद्धिस्ट इंटरनॅशनल मिशन जालंधरचे अध्यक्ष सोहनलाल गिंडा यांनी व्यक्त केली.पुलगाव येथील बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पब्लिक स्कूल येथे पार पडलेल्या फेस्टीवलमध्ये ते बोलत होते. या फेस्टीवलचे उदघाटन समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष इंजिनियर विजय मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बालरोगतज्ज्ञ डॉ. सचिन बागडे, चंद्रसेन डोंगरे, डॉ. सुभाष खंडारे, राजरत्न कुंभारे, भारत रंगारी, राजकुमार बेलसरे, किशोर येसनकार, देवानंद गायगवळी, सरपंच वनिता शिंगणापुरे, वहिदा शेख उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रसेन डोंगरे यांनी केले. संचालन प्रा. लता डोंगरे यांनी केले. याप्रसंगी प्रणव गायगवळी यांच्या इंद्रीयधुंद पुस्तकाचे प्रकाशन अतिथींच्या हस्ते करण्यात आले. तसेच फेस्टीवलच्या दुसऱ्या दिवशी औरंगाबाद येथील मिलिंंद महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या व सध्या विविध क्षेत्रात कार्यरत माजी विद्यार्थी मेळावा पार पडला.सोहनलाल गिंडा यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या मेळाव्यात गोवर्धन भगत, शिवदास वासे, शुद्धोदन मून, सुमंत भारसाकळे, प्रमोद थोरात, सुनील बोरडे, डॉ. विजय माहुरे, केलास वानखडे, जाधव, चंद्रसेन डोंगरे उपस्थित होते. याप्रसंगी या माजी विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह प्रदान करुन सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. विजय माहुरे यांनी शाळेला ५० हजारांची मदत आणि दोन विद्यार्थ्यांचा खर्च देण्याची तसेच चंद्रसेन डोंगरे यांनी २५ हजाराची देणगी जाहीर केली. बौद्धधर्म प्रसारात महिलांचा योगदान या विषयावर महिला परिसंवाद घेण्यात आला. यात प्रा. डॉ. सरोज आगलावे, प्रा. विशाखा कांबळे, सुहास खंडारे, प्रा. अलका, डोंगरे, डॉ. सुरेखा तायडे, प्रा. लता डोंगरे, संजीवनी रंगारी सहभागी होते. जगाची घडी बसविण्यासाठी एकच धर्म तो म्हणजे बौध्द धर्म असून स्त्री पुरूष समानतेच्या आजच्या काळात महिलांनी आपली जबाबदारी ओळखून सक्षम व्हावे. संचालन डॉ. माहुरे, डॉ. लता डोंगरे यांनी केले. समारोपीय कार्यक्रम माजी मंत्री सुलेखा कुंभारे, सोहनलाल गिंंडा, जयकिरणसिंग, प्रा. सुभाष चहांदे यांच्या उपस्थितीत झाला.