शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

अ. भा. साहित्य संमेलन भव्य झाले, दिव्य नाही; पैशाने सारे विकत घेता येत नाही

By नरेश डोंगरे | Updated: February 5, 2023 18:32 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगर ( वर्धा ) - तुम्हारा लहेजा बता रहा हैं, तूम्हारी दौलत नई नई हैं! ...

राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगर (वर्धा) - तुम्हारा लहेजा बता रहा हैं, तूम्हारी दौलत नई नई हैं! हा दोन ओळीचा शेर खूप बोलका आहे. पैसे जवळ आले म्हणजे सारे आल बेल करुन घेता येत नाही.  बापू विनोबांच्या कर्मभूमी पार पडलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनातून ते पुन्हा एकदा अधोरखित झाले. भक्कम आर्थिक पाठबळामुळे  संमेलन भव्य झाले. मात्र आयोजनातील विविध उणीवांमुळे या भव्यतेला दिव्यतेची झालर लागू शकली नाही.

वर्धेच्या रामनगर परिसरात २६ एकरांच्या विस्तीर्ण परिसरात साहित्य नगरी निर्माण करण्यात आली होती. या नगरीला राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगर असे नाव देण्यात आले होते. साहित्य संमेलनाचे हे ९६ वे आयोजन भव्य दिव्य व्हावे यासाठी सरकारने आर्थिक नव्हे तर दुसरीही हरसंभव मदत आयोजकांना केली होती. तब्बल दोन कोटींचे अनुदान दिले. गडकरी मेघेंचे पाठबळ वेगळे होते. बाकीही काही वेगळे अर्थमार्ग आयोजकांना येऊन भेटले होते.

शीर्षस्थ नेत्यांनी शब्द टाकून कुमार विश्वास सारख्या लोकप्रीय विख्यात साहित्यिकाला या संमेलनात बोलवून घेत संमेलनाला वेगळी श्रीमंती जोडली होती. त्यामुळे साहित्य नगरीतील विनोबा भावे सभामंडप, राम शेवाळकर व्यासपीठ, मनोहर म्हैसाळकर सभामंडप, देविदास सोटे कवी कट्टा, सुरेश भट गझल कट्टा, lमावशी केळकर तसेच अन्य सभा मंडप अत्यंत चांगल्या पद्धतीने तयार झाले होते. ग्रंथ आणि पुस्तक प्रदर्शनीचा परिसरही प्रशस्तच बनविण्यात आला होता. हे सारे काही भव्यपणे साकारले, त्यामुळे आपसुकच त्याला दिव्यतेची जोड मिळेल, असा आयोजकांचा होरा होता. त्यामुळे आयोजक ओव्हर कॉन्फिडंट झाले. त्यांनी प्रत्यक्ष संमेलनाच्या अंमलपूर्तीसाठी मनात येईल तशा पद्धतीने आयोजन समित्या तयार केल्या.क्षमता नसणाऱ्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आणि येथूनच  गडबड घोटाळा सुरू झाला. आयोजन सुरेख व्हावे याची काळजी न घेता 'अनेकांनी स्टाईल मे रहने का' फंडा अवलंबला. उणीवांकडे दुर्लक्ष करून खुशमस्करे पुढे पुढे करत प्रतिभावंतांना दुर्लक्षित करू लागल्यामुळे अनेक जण रुष्ट झाले. 

साहित्य नगरीला जायचे नाही,अशी भूमिका घेतली. अनेकांनी फोनोफ्रेंड करत एकमेकांना आपली भावनाही बोलून दाखवली. त्यांची अनुपस्थिती आणि व्यक्त केलेल्या भावना या संमेलना भोवती नाराजीच वलय निर्माण करणाऱ्या ठरल्या. त्यामुळे उन्हाची तीव्रता कमी करणारे मोठे पांढरे शुभ्र सभामंडप आणि त्यात मोठ्या प्रमाणात श्रोत्यांना बसण्यासाठी खुर्च्या ठेवण्यात आल्या असल्या तरी श्रोत्यांनी त्या दुर्लक्षित केल्या. परिणामी बोलणारे, सांगणारे आणि ऐकवणारे मोठ्या संख्येत असले तरी ऐकणारे पाहिजे त्या प्रमाणात उपस्थित नसल्याने हे सभामंडप ओशाळल्यासारखे झाले. परिणामी साहित्य नगरी भव्य दिसत असली तरी तिला दिव्यत्वाची जोड मिळू शकली नाही. एकूणच पैशाने सारे विकत घेता येत नाही, याची प्रचिती या संमेलनात पुन्हा एकदा आयोजकांसह अनेकांना आली.

स्टॉलधारकही  दुर्लक्षित!

सारस्वतांच्या नगरीत जाऊन श्रीमंती पूजन करण्याचे अनेकांची योजना होती. त्यामुळे त्यांनी साहित्य नगरीत दोन हजारापासून पंधरा हजार रुपयांपर्यंत रक्कम मोजली आणि आपल्या वेगवेगळ्या दुकानांसाठी स्टॉल विकत घेतले. मात्र आयोजकांनी  त्यांना कोणतीही चांगली सुविधा उपलब्ध करून दिली नाही. सम्मेलन सुरू होण्याच्या पूर्वसंधेपासून तो समारोपापासून ते दुर्लक्षितच राहिले. 

टॅग्स :wardha-acवर्धा