अजित पवारांचा वर्धा जिल्हा राष्ट्रवादीने केला जाहीर निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 15:33 IST2019-11-23T15:30:50+5:302019-11-23T15:33:54+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धा जिल्हा बैठकीत जाहीर निषेध करण्यात आला व संपूर्ण जिल्ह्यातील पदाधिकारी शरद पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत असा एक मुखी ठराव पारीत करण्यात आला.

अजित पवारांचा वर्धा जिल्हा राष्ट्रवादीने केला जाहीर निषेध
ठळक मुद्देपक्षाच्या १८ सेलचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित दिवाकर गमे यांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी एकांगी निर्णय घेऊन पक्षाला व राष्ट्रीय नेतृत्वाला विश्वासात न घेता भाजपला पाठींबा देऊन स्वत: सरकारमध्ये सहभागी झाले. याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धा जिल्हा बैठकीत जाहीर निषेध करण्यात आला व संपूर्ण जिल्ह्यातील पदाधिकारी शरद पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत असा एक मुखी ठराव पारीत करण्यात आला. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रा.दिवाकर गमे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस किशोर माथनकर यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.