शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

शेती खरेदी-विक्री बंदी अडचणीची

By admin | Updated: August 14, 2014 23:51 IST

अज्ञानी व भोळ्या आदिवासी समाजाची कुणी फसवणूक करू नये म्हणून त्यांच्या शेतजमिनीचा खरेदी-विक्री व्यवहार सवर्णांशी जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगी शिवाय होऊ शकत नाही,

आदिवासी त्रस्त : उपाययोजना करण्याची मागणीरोहणा : अज्ञानी व भोळ्या आदिवासी समाजाची कुणी फसवणूक करू नये म्हणून त्यांच्या शेतजमिनीचा खरेदी-विक्री व्यवहार सवर्णांशी जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगी शिवाय होऊ शकत नाही, हा शासनाचा कायदा आहे; पण तो आता कालबाह्य झाला आहे़ सध्या हा कायदाच आदिवासींना अडचणीचा ठरू पाहत आहे. या कायद्यामुळे आर्थिक अडचणीतील आदिवासी व्यक्ती आपली शेतजमीन कुणालाही विकून काम भागवू शकत नाही़ याकडे लक्ष देत उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. पूर्वीच्या काळी आदिवासी समाजात शिक्षणाचा अभाव होता. त्यांना कायद्याची पूरेशी जाण नव्हती़ परिणामी, समाजातील सवर्ण, सावकार, स्वार्थी व मालगुजार व्यक्ती आदिवासींच्या जमिनी अत्यंत माफक दरात आपल्या नावी करून घेत व त्यांची फसवणूक करीत होते़ यामुळे अनेक आदिवासी भूमिहिन झाले. मालगुजार व्यक्ती केवळ शेतसाऱ्यात आदिवासींच्या जमिनी हडप करीत होते़ हा अन्याय होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने आदिवासी व्यक्ती शेतजमीन आदिवासी व्यक्तींनाच विकू शकतो. गैरआदिवासींना विकायची असल्यास विक्रेत्याला जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे कायद्याने अनिवार्य केले आहे. फार पुर्वी जो कायदा आदिवासींचे फसवणुकीपासून संरक्षण करीत होता, तोच कायदा बदलत्या काळात आदिवासींना डोकेदुखी ठरू पाहत आहे़ आर्थिक अडचण त्वरित सोडविण्यासाठी शेतजमिनीची विक्री करताना हा कायदा त्रासदायक, वेळखाऊ व अडचणीचा ठरत आहे. अलीकडे आदिवासी समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. आपली कुणी फसवणूक करू नये याबाबत समाज जागरुक झाला आहे. आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा प्रतिकार संघटितपणे करता यावा म्हणून आदिवासी संघटना सक्षम झाल्या आहेत. आपल्या हक्काचा वाटा कुणी हिरावत असेल तर त्या विरूद्ध रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याची क्षमता आदिवासींमध्ये निर्माण झाली़ आपणही उच्चशिक्षण घ्यावे, आपल्याही मुलींचे लग्न थाटात व्हावे, आपलेही जीवनमान उच्च दर्जाचे असावे या आशा आकांक्षा आदिवासींमध्ये निर्माण झाल्या आहेत़ अशा स्थितीत मुला-मुलींचे उच्च शिक्षण, त्यांचे लग्नकार्य, कमी प्रतीची अनुपयोगी जमीन विकून उच्चप्रतीची उपयुक्त व सोयीची जमीन खरेदी करणे, शहरात प्लॉट वा घर विकत घेणे आदी आर्थिक व्यवहार करताना अनेक आदिवासींना आपली शेतजमीन त्वरित विकण्याची गरज असते; पण विद्यमान कायद्यामुळे हा व्यवहार करण्यासाठी दुसरा आर्थिक सक्षम आदिवासी उपलब्ध होत नाही. जिल्हाधिकाऱ्यांची पुर्व परवानगी घेणे म्हणजे ‘भिक नको; पण कुत्रा आवर’, असे जिकरीचे झाले आहे. यामुळे हा कायदा आदिवासींच्या प्रगती व उच्च अपेक्षापूर्तीमध्ये अडसर ठरत आहे. सदर कायदा बदलत्या परिस्थितीत कालबाह्य असल्याची भावना अनेक आदिवासींनी व्यक्त केली़ शासन, प्रशासनानेही कालबाह्य झालेल्या या कायद्यात सुधारणा करावी आणि आदिवासींनाही जमीन विक्रीचे स्वातंत्र्य द्यावे, अशी मागणी होत आहे़(वार्ताहर)