पाच दिवसानंतरही प्रशासन सुस्तच
By Admin | Updated: August 15, 2015 02:12 IST2015-08-15T02:12:42+5:302015-08-15T02:12:42+5:30
हिंगणी वनविभागातील विविध कामासाठी ठेवण्यात आलेल्या स्थायी अस्थायी कामगाराच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत.

पाच दिवसानंतरही प्रशासन सुस्तच
अधिकारी म्हणतात, प्रश्न जिल्हास्तरावर : वन कामगाराचे आमरण उपोषण सुरूच
बोरधरण : हिंगणी वनविभागातील विविध कामासाठी ठेवण्यात आलेल्या स्थायी अस्थायी कामगाराच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. या विरोधात राष्ट्रीय मजदूर कॉग्रेसचे भास्कर मुडे आमरण उपोषण तर चौघांनी वनविभागाच्या कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. पाच दिवस लोटूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेतलेली नाही.
सामाजिक वनीकरणातून संशोधन केंद्र वनविभाग वॉईल्ड लाईफ येथील १० ते १५ वर्ष वनविभागाचे सेवा केलेल्या कामगारांना कामावरून कमी करण्यात आले. अशा कामगारांना ज्येष्ठतेप्रमाणे कामावर घेण्यात यावे. या संदर्भात यापूर्वी १० डिसेंबर २००१ पासून भास्कर मुडे यांनी १२ दिवसाचे उपोषण केले. अधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासन न पाळल्याने मुडे पुन्हा उपोषणाला बसले. वनविभागातून काम उपलब्ध असूनसुद्धा एफ.डी.सी.एम. च्या लोकांना काम दिले जात नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. वाईल्ड लाईफ येथील कामगारांना १५ ते २० वर्ष सेवा केली असून त्यांना कामावरून बंद करण्यात आले तर नवीन लोकांना कामावर घेण्यात आले. हिंगणी वनपरिक्षेत्रातील बारमाही कामावर बंद कामगारांना १९९५ या मंत्री वने संघटना पदाधिकारी यांच्या सोबत चर्चा करून बंद कामगारांना कामावर घेण्याबाबत आदेश ही देण्यात आले.
सेलू पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष बाकल, जि.प.चे माजी अध्यक्ष पप्पु (विजय) जयस्वाल, माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे यांनी उपोषण स्थळाला भेट दिली.(वार्ताहर)