शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

निंबोलीच्या पुनर्वसनाला प्रशासकीय ‘ग्रहण’

By admin | Updated: December 18, 2014 23:00 IST

तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले निंबोली (शेंडे) गाव निम्न वर्धा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात गेले; पण अद्याप गावाचे पुनर्वसन करण्यात आले नाही़ एका तप लोटूनही पुनर्वसन न झाल्याने ग्रामस्थांच्या

आर्वी : तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले निंबोली (शेंडे) गाव निम्न वर्धा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात गेले; पण अद्याप गावाचे पुनर्वसन करण्यात आले नाही़ एका तप लोटूनही पुनर्वसन न झाल्याने ग्रामस्थांच्या मूलभूत गरजाही पूर्ण होत नसल्याचे दिसते़ या गावाच्या पुनर्वसनाला प्रशासकीय ग्रहण लागल्याचेच दिसते़ निंबोली (शेंडे) या गावातील परिवहन परिवहन महामंडळाची बस गत सहा महिन्यांपासून बंद आहे. यामुळे या गावातील ९० शालेय मुला- मुलींना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो़ आर्वी आणि देऊरवाडा येथील शाळेत गत सहा महिन्यांपासून या विद्यार्थ्यांचा खासगी वाहनांनी धोकादायक प्रवास सुरू आहे़ हे गाव निम्न वर्धा पुनर्वसन बाधित गावात येत असून सर्व गावांचे पुनर्वसन आर्वी व लगत करण्यात आले; पण निंबोलीचे पुनर्वसन रखडले आहे़ येथील ग्रामस्थांनी आर्वी-देऊरवाडा मार्गावरील दौलतपूर मौजातील शेतजमीन पुनर्वसनासाठी मागितली होती; पण ओलिताची असल्याने संबंधित शेत मालकांनी ती जमीन पुनर्वसनासाठी देण्यास नकार दिला़ शिवाय या प्रकरणी न्यायालयात धाव घेतली़ लाभ क्षेत्राची जमीन पुनर्वसनास देता येत नाही, असा नियम असल्याचे पुनर्वसन विभाग सांगत आहे़ मग, ही जागा या विभागाने पुनर्वसनासाठी का निवडली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ प्रशासकीय अनागोंदीत गत १२ वर्षांपासून या गावाचे पुनर्वसन रखडले आहे़ यामुळे गावात जाण्यासाठी रस्ते नाही़ यामुळे आर्वी आगाराने गत सहा महिन्यांपासून निंबोली शेंडे येथील बंद केली आहे़ या गावातील सुमारे ९० शालेय विद्यार्थी दररोज खासगी वाहनाने प्रवास करून तालुक्यातील देऊरवाडा व आर्वी येथे शिकण्यासाठी ये-जा करतात़ या वाहनाचे प्रती विद्यार्थी प्रवास भाडे देऊरवाड्यासाठी ६०० रुपये महिना तर आर्वीसाठी ७०० रुपये महिना आहे़ हा आर्थिक भुर्दंड येथील गावकरी सहा महिन्यांपासून नाहक सहन करीत आहेत़ पुनर्वसन न झाल्याने गावात कुठल्याही मूलभूत सोई-सुविधा नाहीत़ गावाचा संपूर्ण विकास रखडला आहे़ ग्रामस्थांना कामासाठी आर्वी येथे १८ किमी पायपीट करीत जावे लागते़ गावात रात्री कुणी आजारी पडले तर खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागतो. प्रशासनाने याकडे लक्ष देत पुनर्वसन करावे, अशी मागणी होत आहे़(तालुका प्रतिनिधी)