व्यसनी पतीने केली पत्नीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:07 AM2018-10-20T00:07:22+5:302018-10-20T00:08:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : संशयीत वृतीच्या तसेच दारूचे व्यसन असलेल्या पतीने पत्नीची हत्या केली. ही घटना कारला चौक ...

Addictive husband murdered wife | व्यसनी पतीने केली पत्नीची हत्या

व्यसनी पतीने केली पत्नीची हत्या

Next
ठळक मुद्देकारला चौक परिसरातील घटना : रामनगर पोलीस ठाण्यात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : संशयीत वृतीच्या तसेच दारूचे व्यसन असलेल्या पतीने पत्नीची हत्या केली. ही घटना कारला चौक भागातील नटाळा पुनर्वसन येथे बुधवारी रात्री उशिरा घडली. रेखा देवराव मोहिजे (५०), असे मृतक महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मृतक महिलेच्या मुलीच्या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात आरोपी देवराव मोहिजे याच्याविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास मुलगी घरी परतल्यानंतर ही घटना तिच्या निदर्शनात आली. त्यानंतर रामनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेनंतर आरोपी पती देवराव मोहिजे याने घटना स्थळावरुन यशस्वी पळ काढला. घटनेनंतर पसार झालेल्या आरोपीच्या शोधार्थ रामनगर पोलिसांच्या तीन चमू रवाना करण्यात आल्या होत्या. दरम्यान दसऱ्याच्या दिवशी रामनगर पोलिसांना आरोपी जखमी अवस्थेत गवसला. त्याच्यावर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी आणि मृतक यांच्यात नेहमी छोट्या-छोट्या करणावरुन भांडण होत होते. बुधवारी छोट्याशा कारणावरून झालेला वाद विकोपाला जाऊन त्याचे हाणामारीत रूपांतर झाले. याच वेळी आरोपीने रेखाचे डोके जमिनिवर ठेचुन तिची हत्या केल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तापसात पुढे आले आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.

आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
रामनगर पोलीस रेखा मोहिजे हिच्या मारेकºयाचा शोध घेत असतानाच आरोपी देवराव मोहिजे याने स्वत:वर चाकूने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न ेकेला. आत्महत्येचा हा प्रयत्न देवराव याने वर्धा शहरातील अंबिका चौक परिसरात केला. त्यानंतर त्याला परिसरातील नागरिकांच्या मदतीने तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी देवराव मोहिजे याच्याविरुद्ध वर्धा शहर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सन २०१६ मध्ये हाणामारीचा गुन्हा
सन २०१६ मध्ये मृतक रेखा मोहिजे यांच्या तक्रारीवरुन देवराव मोहिजे यांच्याविरुद्ध भादंविच्या ३२४ अन्वये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, असेही पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे.

आरोपी हा महावितरणचा सेवानिवृत्त कर्मचारी
सदर घटनेतील आरोपी देवराव मोहिजे हे महावितरण कंपानीतील सेवानिवृत्त लाईनमन आहेत. त्यांना दारूच्या व्यसनाने ग्रासल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले. शिवाय ते संशयी वृत्तीचे असल्याचेही सांगण्यात आले. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी वर्धा शहरातील एका खासगी कंपनित सुरक्षारक्षक म्हणून काम करण्यास सुरूवात केली. तसेच ते या खाजगी कंपनीत सध्या कार्यरत आहेत.

धीरज निघाला भारतीचा मारेकरी
पुलगाव येथील हत्येचे रहस्य उलगडले


लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पुलगाव येथील भारती जांभुळकर हत्या प्रकरणातील आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. मागील सुमारे सव्वा महिन्यापासून भारतीचा मारेकरी पोलिसांची दिशाभूल करीत होता. अखेर खात्रिदायक माहिती हाती लागल्यानंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून पती धीरज यानेच पत्नी भारतीची हत्या केल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, रेल्वे वसाहत, पुलगाव येथील रहिवासी भारती जांभुळकर हिचा मृतदेह तिच्याच घरात १५ सप्टेंबरला दुपारी मिळाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी मृतक भारतीचे पती धीरज यांच्या तक्रारीवरून अज्ञात मारेकºयाविरुद्ध पुलगाव पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन तर पुलगाव पोलिसांच्या तीन चमू रवाना करण्यात आल्या होत्या. महिना लोटला तरी पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले नसल्याने व पुलगाव शहरात उलट-सुटल चर्चेला उधान आले होते. या प्रकरणाचा छडा लावताना पुलगावचे ठाणेदार मुरलीधर बुराडे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांनी आपसात ताळमेळ ठेवून वरिष्ठ अधिकाºयांच्या मार्गदर्शनात तपासाला गती दिली. दरम्यान काही खात्रिदायक माहिती पोलिसांच्या हाती लागताच त्याची शहानिशा करण्यात आली. शिवाय पुरावेही गोळा करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष साक्षदार, फिर्यादी व संशयीत आरोपी यांचे संबंधातील व्यक्ती, नातलग, मित्र, आसपासचे परिसरात राहणारे सराईत गुन्हेगार, परिसरातील नागरिक आदींना विचारपूस केल्यानंतर पुन्हा एखदा तक्रारकर्ता असलेल्या धीरला पोलिसांनी विचारपूस केली. त्यावेळी सुमारे महिन्याभºयापासून पोलिसांची दिशाभूल करणाºया धीरजने गुन्ह्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपीला पुलगाव पोलिसांनी न्यायालयात हजर करून त्याची २२ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळविली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे, पुलगावचे ठाणेदार मुरलीधर बुराडे, पीएसआय महेंद्र इंगळे, सहा. फौजदार नामदेव किटे, पोलीस शिपाई सलाम कुरेशी, स्वप्नील भारद्वाज, मनीषा श्रीवास, जगदीश डफ, सचिन खैरकार, विवेक बन्सोड, रवींद्र मुजबैले, अमोल आत्राम, किसना कास्देकर, विकास मुंडे आदींनी केली.
अनैतिक संबंध विकोपाला
भारती जांभुळकर हिची हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे.

Web Title: Addictive husband murdered wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.