दारू भरलेल्या वाहनाला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 23:43 IST2018-04-13T23:43:21+5:302018-04-13T23:43:21+5:30

येथील सेवाग्राम मार्गावरील गोल्हर सभागृहाजवळ दारू भरलेल्या वाहनाला अपघात झाला. यावेळी वाहनचालक पसार झाला. या अपघाताची माहिती नागरिकांना मिळताच त्यांनी वाहनातील दारूची लूट केली.

Accidents with alcohol-filled vehicles | दारू भरलेल्या वाहनाला अपघात

दारू भरलेल्या वाहनाला अपघात

ठळक मुद्देचालक पसार : नागरिकांकडून दारूची लूट

लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : येथील सेवाग्राम मार्गावरील गोल्हर सभागृहाजवळ दारू भरलेल्या वाहनाला अपघात झाला. यावेळी वाहनचालक पसार झाला. या अपघाताची माहिती नागरिकांना मिळताच त्यांनी वाहनातील दारूची लूट केली. ही घटना गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास सेवाग्राम मार्गाने भरधाव वेगाने नागपूरकडून दारूच्या पेट्या भरून येत एम.एच.२३ ऐ.डी.९१५१ क्रमांकाचे वाहन येथील एका सभागृहाजवळील वळणावर उलटले. यावेळी अंधाराचा फायदा घेत वाहन चालक जखमी अवस्थेत पसार झाला.
या अपघाताची माहिती परिसरातील नागरिकांना होताच त्यांनी घटनास्थळावर धाव घेत वाहनात असलेल्या दारूची चांगलीच लूट केली. घटनेची माहिती मिळताच समुद्रपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता त्यांच्या हाथी फक्त नागरिकांच्या हातातुन जमिनीवर पडलेल्या दारूच्या बाटल्या लागल्या. यावेळी पोलिसांनी पलटी झालेले वाहन आपल्या ताब्यात घेवून एकूण सात लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर करवाई एएसआय उमेश हरनखेडे, मनोहर मुुंदे यानी केली. अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. असे असले तरी पोलिसांना अद्याप सुगारा लागला नसल्याची माहिती आहे.

Web Title: Accidents with alcohol-filled vehicles

टॅग्स :Accidentअपघात