वर्धा-नागपूर मार्गावर विद्यार्थ्यांच्या मेटॅडोरला भीषण अपघात; काहींची प्रकृती गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 15:12 IST2018-01-11T15:11:36+5:302018-01-11T15:12:54+5:30
केळझर येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराला जाणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मेटॅडोरला गुरुवारी दुपारी १ च्या सुमारास भीषण अपघात होऊन अनेक विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाल्याचे वृत्त आहे.

वर्धा-नागपूर मार्गावर विद्यार्थ्यांच्या मेटॅडोरला भीषण अपघात; काहींची प्रकृती गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: केळझर येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराला जाणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मेटॅडोरला गुरुवारी दुपारी १ च्या सुमारास भीषण अपघात होऊन अनेक विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाल्याचे वृत्त आहे. हे विद्यार्थी यशवंत महाविद्यालयातील असल्याचे सांगण्यात येते.
वर्धा नागपूर मार्गावर सेलूच्या पुढे तीन किलोमीटरवर असलेल्या कोटंबा पाटी येथे समोरून येणाऱ्या ट्रकने या मेटॅडोरला जबरदस्त धडक दिली. हे विद्यार्थी शिबिरासाठी मंडप व भोजनाचे सामान घेऊन पुढे निघाले होते. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने वर्धा व सेलू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अद्याप जखमी वा मृतांचा आकडा निश्चितपणो कळलेला नाही.