नागपूर-अमरावती मार्गावर अपघात; दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 06:00 IST2019-09-05T06:00:00+5:302019-09-05T06:00:19+5:30

या अपघातात एम.एच. ०१ बी.वाय. ५९०८ क्रमांकाच्या कार मधील अक्षय विनोद निहाटकर (२२) व गाडीचालक गौतम एकनाथ मेश्राम (२४) याचा जागीच मृत्यू झाला. तर याच गाडीतील तिघे थोडक्यात बचावले. तर ज्या गाडीवर भरधाव कार आदळली त्या वाहनाचा चालक मोहम्मद इजाज मोहम्मद जलील (४५) हे जखमी झाले. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचा चुराडा झाला.

Accident on Nagpur-Amravati road; Both killed | नागपूर-अमरावती मार्गावर अपघात; दोघे ठार

नागपूर-अमरावती मार्गावर अपघात; दोघे ठार

ठळक मुद्देएक जखमी : तिघे बचावले, ठाणेगाव शिवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.)/ ठाणेगाव : नागपूरवरून चांदूर (रेल्वे)च्या दिशेने जात असलेल्या कार अचानक अनियंत्रित झाली. वाहनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असताना वाहन रस्तादुभाजकावर चढले. शिवाय विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारला त्या कारने धडक दिली. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. तर तिघे थोडक्यात बचावले. हा अपघात नागपूर-अमरावती महामार्गावरील ठाणेगाव शिवारात बुधवारी ४.४५ वाजताच्या सुमारास झाला.
प्राप्त माहितीनुसार, एम. एच. ०१ बी. वाय. ५९०८ क्रमांकाची कार चांदूर रेल्वेच्या दिशेने जात होती. भरधाव वाहन ठाणेगाव शिवारात येताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अशातच वाहन रस्तादुभाजकावर चढले. शिवाय या कारने विरुद्ध दिशेने येणाऱ्या एम. एच. ०४ ई. क्यू. ४९८२ क्रमांकाच्या कारला धडक दिली. या अपघातात एम.एच. ०१ बी.वाय. ५९०८ क्रमांकाच्या कार मधील अक्षय विनोद निहाटकर (२२) व गाडीचालक गौतम एकनाथ मेश्राम (२४) याचा जागीच मृत्यू झाला. तर याच गाडीतील तिघे थोडक्यात बचावले. तर ज्या गाडीवर भरधाव कार आदळली त्या वाहनाचा चालक मोहम्मद इजाज मोहम्मद जलील (४५) हे जखमी झाले. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचा चुराडा झाला. शिवाय क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त दोन्ही वाहनांना रस्त्याच्याकडेला करण्यात आले. सदर घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक काही काळाकरिता खोळंबली होती. माहिती मिळताच कारंजा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. शिवाय मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठविला. या घटनेची नोंद कारंजा पोलिसांनी घेतली आहे.

Web Title: Accident on Nagpur-Amravati road; Both killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात