शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय बालगृहातून अल्पवयीन मुलाचे ‘अपहरण’, शहर पोलिसांत तक्रार दाखल

By चैतन्य जोशी | Updated: September 13, 2023 16:41 IST

मुलाच्या शोधार्थ पोलिस पथके रवाना

वर्धा : शासकीय मुलांच्या बालगृहातून ११ वर्षीय मुलाला अज्ञाताने पळवून नेल्याची घटना केळकरवाडी परिसरातील बालगृहात घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, मुलाच्या शोधार्थ पोलिस पथके रवाना झाली आहेत. १३ रोजी पोलिसांनी बालसुधारगृहात जात चौकशी केल्याची माहिती बालगृह निरीक्षक अशोक पिव्हाल यांनी दिली.

प्राप्त माहितीनुसार, केळकरवाडी येथे असलेल्या शासकीय मुलांच्या बालगृह (वरिष्ठ) येथे अल्लीपूर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक नलवडे यांनी एका ११ वर्षीय बेवारस मुलाला ९ सप्टेंबर रोजी दाखल केले होते. दाखल केल्यानंतर तो बालगृहातील हॉलमध्ये झोपला. दुसऱ्या दिवशी झोपेतून उठल्यानंतर तो बाथरूममध्ये गेला. मात्र, बराच वेळ तो बाथरूममधून बाहेर न आल्याने त्याला बघण्यासाठी बालगृहातील काळजीवाहक गेले असता तो तेथे दिसून आला नाही. त्याचा बसस्थानक, रेल्वेस्थानक आदी ठिकाणी शोध घेऊनही तो मिळून न आल्याने त्याला अज्ञाताने पळवून नेल्याची तक्रार शहर पोलिसांत दाखल करण्यात आली. पोलिसांनी १३ रोजी बालगृहात जात पंचनामा करून चौकशी करीत मुलाच्या शोधार्थ पथके पाठविण्यात आल्याची माहिती बालगृहातील काळजीवाहक पिव्हाल यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीStudentविद्यार्थीKidnappingअपहरणwardha-acवर्धा