शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

७ लाख क्विंटल कापूस शेतकऱ्यांकडे पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:01 IST

महाराष्ट्रात विशेषत: विदर्भात सर्वात जास्त कापूस उत्पादक शेतकरी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण देशात लॉकडाऊन असल्यामुळे सीसीआय व बाजार समितीच्यावतीने खरेदी केंद्र बंद होते त्यामुळे शेतकऱ्यांचा कापुस घरीच शिल्लक असल्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

ठळक मुद्देवायगाव (नि.) येथे लॉकडाऊनमध्ये खरेदीस सुरूवात । सोमवारी आणखी केंद्र उघडले जाण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हयात सुमारे २६ लाख क्विटंल कापसाचे उत्पादन झाले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी सीसीआयची कापूस खरेदी बंद होईपर्यत १९.५० लाख क्विटंल कापसाची खरेदी झाली होती. शेतकऱ्यांकडे सुमारे ७ लाख क्विंटल कापूस शिल्लक असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीसीआय खरेदी केंद्र बंद करण्यात आले होते. बंद झालेले सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरु करण्याकरिता केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री, सीसीआयचे अध्यक्ष , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, पणनमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे खा. रामदास तडस यांनी पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर वर्धा जिल्ह्यातील बहुतांश सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरु झाले आहे. सोमवारी सेलू सह आणखी काही कापूस खरेदी केंद्र सुरू होतील अशी माहिती खासदार रामदास तडस यांनी वायगांव येथे दिली. सिंधानिया जिनिंग कंपनीत सीसीआय कापूस खरेदी केंद्राला खासदारांनी शनिवारी भेट दिली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्याम कार्लेकर, जिल्हा निंबधक गौतम वालदे, जिनिंगचे मालक पवन सिंघानिया, अंकीत सिंघानिया, बाजार समितीचे सचिव समीर पेंडके, सदस्य विजय बंडेवार, सदस्य मुकेश अळसपूरकर, सदस्य शरद झोड, सदस्य दत्ताजी महाजन, मिलींद भेंडे, सीसीआय ग्रेडर बोखले व रमेशकुमार उपस्थित होते.महाराष्ट्रात विशेषत: विदर्भात सर्वात जास्त कापूस उत्पादक शेतकरी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण देशात लॉकडाऊन असल्यामुळे सीसीआय व बाजार समितीच्यावतीने खरेदी केंद्र बंद होते त्यामुळे शेतकऱ्यांचा कापुस घरीच शिल्लक असल्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

१०० वाहनातून दररोज कापूस घेणारघोराड : सर्वत्र कापूस खरेदी केंद्र सुरू झाले असताना सेलू बाजारपेठेत कापसाची खरेदी करण्यात येत नव्हती. या तालुक्यातील कापूस आर्वीच्या बाजारपेठेत जाणे सुरू झाला. ही बातमी लोकमतमध्ये झळकताच बाजार समितीने पुढाकार घेत सीसीआय व खासगी व्यापारी यांची ३० एप्रिल व १ मे अशा दोन दिवस बैठका झाल्यात.त्यानंतर सोमवारपासून कापूस खरेदी सुरू करण्याचे ठरविण्यात आले.सीसीआय व खासगी व्यापारी हे कापूस खरेदी करणार असून सकाळी ८ वाजताच लिलाव होणार आहे. शनिवार व रविवार वगळता दररोज केवळ १०० वाहनांतून येणारा कापूस खरेदी केला जाणार आहे. या मुळे कापूस खरेदी लांबणार असली तरी शासनाने कोरोना व संचारबंदीत ठरवून दिलेल्या निर्देशानुसार होणार आहे. बाजार समितीने पुढाकार घेत व यांना व्यापाऱ्यांनी दिलेली साथ पाहता आता कापूस उत्पादकांचा घरी असलेला कापूस घराबाहेर निघणार असून शेतकºयांसमोरील आर्थिक संकट दूर होणार आहे.सीसीआय व खासगी व्यापाऱ्यांची बैठक बोलावली. यात सोमवारपासून कापूस खरेदी करण्याचा निर्णय झाला असून शनिवारी तशी यादी सूचना फलकावर प्रसिद्ध केली जाईल. शेतकऱ्यांनी कापूस खरेदीत बाजार समितीला सहकार्य करावे.- विद्याधर वानखेडे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, सिंदी.

टॅग्स :agricultureशेती