आॅनलाईन लोकमतवर्धा : आरोग्यासंदर्भात राज्याला मार्गदर्शक ठरणाºया वर्धा जिल्ह्यात कुपोषित बालके आढळून आल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. महिला व बाल कल्याण विभागाच्यावतीने जिल्ह्यातील अंगणवाडी व मिनी अंगणवाडीत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही आकडेवारी पुढे आली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह कुपोषण निर्मूलनासाठी काम करणाºया यंत्रणांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वर्धेसारख्या प्रगत जिल्ह्यात कुपोषण नसावे, असा अनेकांचा समज असताना तब्बल ६२८ बालके तीव्र कुपोषणाच्या श्रेणीत आढळून आले.महिला व बाल कल्याण विभागाने जिल्ह्यातील १,२८१ अंगणवाडी व १८७ मिनी अंगणवाडीत सर्वेक्षण एका अभियानाच्या माध्यमातून केले. यामध्ये मध्यम कुपोषित बालकांची संख्या ४८२, तीव्र कुपोषित बालकांची संख्या १४६ असल्याचे दिसून आले आहे. २०१६ च्या तुलनेत वर्धा जिल्ह्यातील कुपोषणाची ही आकडेवारी कमी असल्याचा दावा यंत्रणांनी केला असला तरी महिला व बालकल्याण विभाग, आरोग्य विभाग यांच्या कुपोषण निर्मूलनाच्या कार्यावर या आकडेवारीने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.डिसेंबर २०१६ पर्यंत मध्यम कुपोषित बालकांची संख्या ८५४ तर तीव्र कुपोषित बालकांची संख्या १९७ होती. वर्धा जिल्ह्यात ज्या गावांमध्ये कुपोषणाची संख्या तीव्र आहे अशा ठिकाणी बाल ग्रामविकास केंद्र स्थापन करण्यात आले आहे. ज्या गावात साधारणत: दोन पेक्षा अधिक बालके कुपोषित आढळून आले त्यांना तत्काळ ग्रामविकास केंद्रात भर्ती करण्यात आले व ३० दिवस तेथे त्यांच्यावर आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या असल्याचे संबंधीत विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. असे असले तरी वर्धेत या योजना कुचकामी ठरत असल्याचे दिसून आले आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.पूर्वशालेय कुपोषित बालकांकरिता पूरक आहारआजची लहान मुलं या देशाचे भविष्य घडविणारे आहेत, यांच्या विकासाचा पाया मजबूत रहावा याबाबतची महत्वाची जबाबदारी प्रत्येकावर आहे. पुर्वशालेय वयोगटातील बालकांचे वय हे त्यांच्यामध्ये शारीरिक, शैक्षणिक आणि सामाजिक बदल घडविणारे वय आहे. या वयामध्ये योग्य प्रतीचे आणि योग्य प्रमाणात पोषक आणि पुरक आहार सर्वोतोपरी आवश्यक मुलभूत गरज आहे. याकरिताच जिल्ह्याच्या आरोग्य विभागाच्यावतीने अशांना ‘पुर्वशालेय कुपोषित बालकांचे पूरक आहार व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात येत आहे.कुपोषित बालकांसाठी व्हीसीडीसी सेंटरवाढत असलेल्या कुपोषणावर आळा बसविण्याकरिता शासनाच्यावतीने नव्याने व्हीसीडीसी सेंटर (बाल उपचार केंद्र) सुरू करण्यात येणार आहे. या केंद्रात तीव्र कुपोषित असलेल्या बालकांवर औषधोपचार करून त्यांना पोषण आहार देण्यात येणार आहे. कुपोषित बालके आढळलेल्या अंगणवाडीच्या परिसरात असे सेंटर सुरू होणार आहे. ही योजना केंद्र शासनाच्यावतीने राबविण्यात येणार असून कुपोषित बालकांना पोषण आहार देण्यासह त्यांच्या पालकांना समुपदेशन करण्याची जबाबदारी अंगणवाडी आणि आशा सेविकांवर देण्यात आली आहे. जिल्ह्यात लवकरच असे केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे.जिल्ह्यात वर्षाकाठी करण्यात आलेल्या सर्व्हेत कुपोषित बालके आढळून आली आहे. हा आकडा गत वर्षीच्या तुलनेत कमी आहे. असे असले तरी यावर प्रतिबंध लावण्याकरिता शासनाच्यावतीने व्हीसीडीसी केंद्र सुरू करण्यात येत आहे. या केंद्रात कुपोषित बालकांच्या पोषण आहारावर भर देण्यात येणार आहे.- विवेक इलमे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी (सामान्य) तथा प्रभारी अधिकारी महिला बालकल्याण जि.प. वर्धा.
६२८ बालके कुपोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 22:39 IST
आरोग्यासंदर्भात राज्याला मार्गदर्शक ठरणाºया वर्धा जिल्ह्यात कुपोषित बालके आढळून आल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.
६२८ बालके कुपोषित
ठळक मुद्देमहिला बाल कल्याण विभागाचे सर्वेक्षण