शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
5
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
6
रक्षा बंधन २०२५: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
7
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
8
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
9
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
10
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
11
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
12
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
13
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
14
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
15
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
16
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
18
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
19
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
20
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान

बोर व्याघ्र प्रकल्पात वन्य प्राण्यांसाठी ५६ पाणवठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 22:23 IST

बोर व्याघ्र प्रकल्पातील वन्य प्राण्यांची संख्या मोठी आहे. या प्राण्यांना उन्हाळ्यात त्यांच्या अधिवास असलेल्या परिसरातच पिण्याचे पाणी मिळावे म्हणून वनविभागाने नैसर्गिक व कृत्रिम असे ५६ पाणवठे तयार केले. या पाणवठ्यावर नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे२४ पानवठ्यांवर सोलर व्यवस्था : इतर ठिकाणी होतो तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा

रितेश वालदे।लोकमत न्यूज नेटवर्कबोरधरण : बोर व्याघ्र प्रकल्पातील वन्य प्राण्यांची संख्या मोठी आहे. या प्राण्यांना उन्हाळ्यात त्यांच्या अधिवास असलेल्या परिसरातच पिण्याचे पाणी मिळावे म्हणून वनविभागाने नैसर्गिक व कृत्रिम असे ५६ पाणवठे तयार केले. या पाणवठ्यावर नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे वन्यप्राण्यांना उन्हाळ्यात जंगलातच पाणी उपलब्ध झाले आहे.बोर व्याघ्र प्रकल्प ८१२.३२ हेक्टर क्षेत्रात तथा १३८.१२ चौरस किमीमध्ये पसरलेला आहे. यात बोर व न्यू बोर, असे दोन भाग असून वर्धा व नागपूर जिल्हात त्याची सिमा आहे. राज्यातील जैविक विविधता व विपुल वनसंपदा यामुळे वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. उन्हाळ्यात प्राण्यांना जंगल क्षेत्रातच पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून बोर प्रकल्प आहे. सोबतच नैसर्गिक दोन, कृत्रिम १९, सोलर पम्प २३, नॅनो सोलर पम्प एक, टँकरद्वारे नऊ, हातपंप दोन असे ५६ पाणवठे आहेत. सोलर पाणवठ्यावर दिवसभर सोलर पम्पाद्वारे पाणी उपलब्ध होते. अन्य पाणवठ्यांवर टँकरद्वारे नियमित पाणी उपलब्ध करून देण्यासाठी दोन शासकीय टँकर व एक भाडेतत्वावरील टँकर सांगून व्यवस्था करण्यात आली. या पाणवठ्यांवर बोर प्रकल्पातील प्राणी तृष्णातृप्तीसाठी येणार असल्याने पर्यटकांनाही त्यांचे दर्शन घडून जंगल सफारीचा आनंद द्विगुणित होऊ शकणार आहे.बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये जंगल क्षेत्रात प्राण्यांच्या अधिवासाजवळच पाणवठ्याद्वारे पाणी उपलब्ध करून दिल्याने वन्यप्राण्यांची भटकंती थांबली आहे. बोर व्याघ्र प्रकल्पातील दुर्मिळ प्रजातीच्या वन्यप्राण्यांसोबतच पशु व पक्ष्यांसाठी जंगल क्षेत्रातच पाणी उपलब्ध व्हावे म्हणून वनक्षेत्र अधिकारी के.वाय. तळलेकर, जी.एफ. लुचे यांच्यासह वनरक्षक तथा वन कर्मचारी प्रयत्नरत असल्याचे सांगण्यात आले आहे.प्राण्यांसह पक्ष्यांनाही आधार१३८.३२ चौरस किमी परिसरात पसरलेल्या बोर व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राण्यांना या पाणवठ्यांचा आधार मिळाला आहे. बोरमध्ये चितळ, सांबर, अस्वली, चिंकारा, चौसिंगा, रानकुत्रे, नीलगाय, रानडुकरे यासह वाघ, बिबट यांनाही उन्हाळ्यात पाणी उपलब्ध झाले आहे. वन्यप्राण्यांसोबत व्याघ्र प्रकल्पातील विविध प्रजातीच्या पक्ष्यांनाही पाणवठ्याच्या परिसरात निवारा उपलब्ध झाला आहे. यात दुर्मिळ पक्ष्यांचाही समावेश आहे. बोर व्याघ्र प्रकल्पात वन्यप्राण्यांच्या अधिवासाजवळच पाणवठयाद्वारे पाणी उपलब्ध करून दिल्यामुळे वन्यप्राण्यांची भटकंती थांबणार आहे. 

टॅग्स :Tigerवाघ