शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

एन.ए.ची माहिती देण्यासाठी आता ३० दिवसांची मुदत

By admin | Updated: September 5, 2014 00:00 IST

एन.ए.(बिन शेती) परवाण्याच्या नवीन नियमानुसार एन.ए.धारकाने जमीन वापराचे रुपांतरण केल्याच्या दिवसापासून ३० दिवसांच्या आत त्याची माहिती ग्रामअधिकारी किंवा तहसीलदाराना लेखी स्वरुपात देणे

गौरव देशमुख - वायगाव(नि.)एन.ए.(बिन शेती) परवाण्याच्या नवीन नियमानुसार एन.ए.धारकाने जमीन वापराचे रुपांतरण केल्याच्या दिवसापासून ३० दिवसांच्या आत त्याची माहिती ग्रामअधिकारी किंवा तहसीलदाराना लेखी स्वरुपात देणे बंधनकारक केले आहे. शासनाच्या वतीने तसे परिपत्रकानिसार कलविण्यात आले आहे. या निर्णयानुसार संबंधित व्यक्तीने वेळेत माहिती न दिल्यास अकृषक आकारणी देण्याबरोबरच अधिक २५ हजार रुपये किंवा अकृषक आकारणीच्या चाळीसपट, यापैकी जी रक्कम अधिक असेल ती करापोटी भरावी लागणार आहे. त्यामुळे आता एन.ए.ची परवानगी घेऊन वर्षानुवर्ष त्या जमिनीचा घेतलेल्या कारणासाठी वापर न करणाऱ्याना आळा बसणार आहे. संबंधित कार्यालयाकडे असलेली एन.ए.ची वेळखाऊ प्रक्रीया लवकर करण्यासाठी शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता बिनशेती परवाण्यासाठी शहरी भागात जिल्हाधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीची गरज राहणार नाही. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना विभाग त्याला परवानगी देईल. मात्र भोगवटदार वर्ग २ म्हणून धारण केलेल्या किंवा शासनपट्ट्याने दिलेल्या जमिनीवरील एन.ए.साठी जिल्हाधिकाऱ्यांचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्याची संपूर्ण तपासणी करूणच जर प्रमाणपत्र देणे शक्य असेल तरच ते दिले जाईल अन्यथा त्यावरील नजराणा आणि इतर शासकीय कर अथवा देय दिल्यानंतरच त्यास जमीन वाराबद्दलचे प्रमाणपत्र देण्यात येईल. हे प्रमाणपत्र जमीन मालकांनी महाराष्ट्र राज्य प्रादेशिक नियोजन व नगररचना विभागाला सादर केल्यानंतर संबंधित विभागामार्फत बिनशेतीचा दाखला देण्यात येणार आहे. त्यात अधिकाऱ्याना सुद्धा जबाबदारी देण्यात आली आहे. तीस दिवसांच्या आत जमीन मालकाने एन.ए.ची माहिती देणे बंधनकारक आहे. त्याच प्रमाणे सर्व कागदपत्रे अटीशर्ती पूर्ण केल्यानंतर अर्ज सादर केल्यानंतर पुढील तीस दिवसात संबंधित महसूल प्राधिकाऱ्यांनी एन. ए. प्रमाणपत्र संबंधितास देणे बंधन कारक आहे. तसे न झाल्यास प्राधिकाऱ्यास विलंबाची लेखी कारणे घ्यावी लागणार आहे. त्याचबरोबर यात लेखी अथवा अंकगणितीय अशी कुठलीही चुक झाल्यास त्यात संबंधित अधिकाऱ्यास स्वत:हून किंवा एन.ए. धारकाच्या मर्जीवरून दुरूस्ती करण्याचेही अधिकार शासनाने दिले आहेत.