वर्धा जिल्ह्यात 3 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 14:09 IST2020-06-09T14:07:45+5:302020-06-09T14:09:29+5:30

वर्धा जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 13 झाली आहे.

3 new corona patients registered in Wardha district | वर्धा जिल्ह्यात 3 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

वर्धा जिल्ह्यात 3 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

ठळक मुद्देएकूण कोरोनाबाधित 13

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा जिल्ह्यात आज प्राप्त अहवालात आणखी 3 रुग्ण कोरोना बाधित असल्याचे पुढे आले आहे. हे तीन रुग्ण वर्धमनेरी आणि सिंदी रेल्वे येथील रुग्णांच्या निकट संपर्कातील आहेत.

वर्धमनेरी येथील 59 वर्षीय पुरुषाच्या संपर्कातील पत्नी 45 वर्ष आणि मुलगी 21 वर्ष या दोघींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच सिंदी रेल्वे येथील कोरोना बाधित रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सोबत काम करणारे रामनगर रहिवासी 59 वर्षीय पुरुष कोरोना बाधित असल्याचे पुढे आले आहे.
आजच्या तीन कोरोना बाधित रुग्णांसह जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 13 झाली आहे.

Web Title: 3 new corona patients registered in Wardha district