शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

२८ टक्के वाटप दाखविला ९१ टक्के

By admin | Updated: June 2, 2014 01:35 IST

जिल्ह्यात अतवृष्टीनंतर रबी पिकांना गारपीटमुळे प्रचंड झळ बसली. अनेकांचे उभे पीक भुईसपाट झाले.

जिल्ह्यात अतवृष्टीनंतर रबी पिकांना गारपीटमुळे प्रचंड झळ बसली. अनेकांचे उभे पीक भुईसपाट झाले. या नुकसानीचा तत्काळ सर्व्हे करून शेतकर्‍यांना मदत देण्याचे जाहीर केले. या घटनेला अडीच महिने पूर्ण झाले; मात्र शेतकर्‍यांच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही. याचे खरे कारण माहिती अधिकारातून समोर आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २८ टक्के मदतीचे वाटप झाले असताना जिल्हा कृषी अधीक्षकांनी ९१ टक्के वाटप पूर्ण केल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांना पुरविली आहे. माहिती अधिकारातून कृषी अधीक्षकांचे पितळ उघडे पडले असून त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

फेब्रुवारी व मार्च २0१४ या कालावधीत जिल्ह्यात पाऊस व गारपीट झाली. यात अनेक शेतकर्‍यांचे नुकसान झाले. शासनाच्या नियमानुसार त्यांना मदत वाटप केल्याचा अहवाल २१ मे २0१४ रोजी जिल्हा कृषी अधीक्षकांनी जिल्हाधिकारी वर्धा, विभागीय कृषी सहसंचालक नागपूर यांना पाठविला. यामध्ये वर्धा तालुक्यात ५0 टक्के नुकसान आहे. शेतपीक नुकसानीचे क्षेत्र १४८५ हेक्टरआर आहे. याकरिता २ कोटी १ लाख रुपयांचा निधी मिळाला असून त्यापैकी १ कोटी ६९ लाख ८४ हजार रुपये शेतकर्‍यांना वाटप करण्यात आले आहे. वाटप करण्यात आलेल्या निधीची टक्केवारी ८५ असून शेतकरी संख्या २१३२ आहे.

सेलू तालुक्यात ९८४ हेक्टरआर नुकसानीपोटी एकूण १ कोटी ४0 लाख रुपयांपैकी शेतकर्‍यांना १00 टक्के वाटप झाल्याचे दाखविण्यात आले. शेतकरी संख्या १९२३ आहेत.

देवळी तालुक्यात ३८५.३0 हेक्टरआर नुकसानीपोटी एकूण ६0 लाख रुपयांपैकी ५५ लाख ५७ हजार वाटप केला असून त्याची ९२ टक्केवारी आहे. १३३५ शेतकरी संख्या आहे. आर्वी तालुक्यात सर्वाधिक ४११९ हेक्टरआर नुकसान झाले. या नुकसानीपोटी ६ कोटी १0 लाख रुपये निधी मिळाला. यापैकी ५ कोटी ८२ लाख रुपये वाटप झाले असून त्याची टक्केवारी ९५ आहे. शेतकरी संख्या ५,६३९ आहे.

आष्टी(श.) तालुक्यात २७१२.३0 हे. आर. नुकसान झाले आहे. याकरिता एकूण ४ कोटी ३0 लाख रुपये आले असून त्यापैकी शेतकर्‍यांना ३ कोटी ४९ लाख २0 हजार रुपये वाटप करण्यात आल्याचे दाखविण्यात आले. वाटपाची टक्केवारी ८१ असून एकूण शेतकरी संख्या ४३८४ आहे. तालुक्यातील बँकांनी सीडी व हार्ड कॉपीमध्ये आणि इंग्रजीत नावांची यादी मागितली. या याद्या सादर करायला विलंब झाला. त्यामुळे आतापर्यंत अवघ्या २५ टक्के लोकांना वाटप झाले.

जिल्हा कृषी अधीक्षक ९१ टक्के वाटप पूर्ण झाल्याचे दाखवून दिशाभूल करीत असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे.

कारंजा (घा.) तालुक्यात १७६२ हेक्टरआर नुकसान झाले असून २ कोटी ७0 लाख रुपये मिळाले आहे. त्यापैकी २ कोटी ५४ लाख ६९ हजार शेतकर्‍यांना वाटप करण्यात आला. वाटपाची टक्केवारी ९४ असून एकूण शेतकरीसंख्या ५७४३ दाखविली आहे. हिंगणघाट तालुक्यात ५९४.६५ हे.आर. नुकसान दाखविण्यात आले आहे. एकूण ८0 लाख निधी प्राप्त झाला आहे. त्यापैकी ६६ लाख ५६ हजार रुपये वाटप करण्यात आले. वाटपाची टक्केवारी ८३ आहे. एकूण शेतकरी संख्या १२८१ आहे. समुद्रपूर तालुक्यात शुन्य टक्के नुकसान झाल्याची आकडेवारी दाखविण्यात आली आहे.