शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नऊ टिप्परसह २७ ब्रास रेतीसाठा जप्त

By admin | Updated: January 8, 2016 02:37 IST

तालुक्यातील मानगाव रेती घटावरून एका रॉयल्टीवर तीन ट्रक रेतीची वाहतूक करीत असल्याची माहिती ...

समुद्रपूर तहसीलदाराची मानगाव घाटावर कारवाई समुद्रपूर : तालुक्यातील मानगाव रेती घटावरून एका रॉयल्टीवर तीन ट्रक रेतीची वाहतूक करीत असल्याची माहिती तहसीलदारांना मिळाली. यावरून त्यांनी कारवाई केली. यात त्यांनी नऊ टिप्पर जप्त केले. यात १ लाखाची रेती व ४५ लाख रुपयांचे टिप्पर असा एकूण ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई तहसीलदार सचिन यादव यांनी बुधवारी मध्यरात्री केली. सुत्रानुसार, मानगाव घाट येथील ठेका महालक्ष्मी ट्रान्सपोर्ट नामक कंपनीला देण्यात आला आहे. या कंत्राटदाराने प्रयेक ट्रकला रॉयलटी देणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही. येथून टिप्परधारक एक रॉयल्टीवर तीन ते चार ट्रीप आणत होता. यात कंत्राटदाराचा लाभ होत होत असला तरी शासनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. याची तालुक्यात ओरड सुरू झाली. याची माहिती तहसीलदार सचिन यादव यांच्या कानावर आली. त्यांनी या गुप्त सुचनेच्या आधारावर मंडळ अधिकारी मुन्नालाल भलावी, वाहन चालक राजू आखाडे यांच्या सहाय्याने नऊ टिप्परची तपासणी केली. त्यांच्याकडे रायल्टी मिळाली नाही. रॉयल्टी नसल्याच्या कारणावरून त्यांनी ४५ लाख रुपयांचे टिप्पर व १ लाख रुपयांची रेती जप्त केली. त्यांनी जप्त केलेल्या टिप्परमध्ये एमएच ४० वाय ३३२४, एमएच ३१ सीक्यू २६०४, एमएच ३१, ३२१५, एमएच ३४ एबी ५२५७, एमएच ३१ सीबी ३०३७, एमएच २७ सी ४६३, एमजी ०४ जे २६३८, एमएच ३१ सीबी ५८६७, एमएच ३१ सीक्यू ७१५५ क्रमांकांच्या वाहनांचा समावेश आहे.(तालुका प्रतिनिधी)