शहरं
Join us  
Trending Stories
1
Prithviraj Chavan : सांगलीच्या निकालातून धडा घेतला पाहिजे; पृथ्वीराज चव्हाणांचा उद्धव ठाकरेंना सल्ला
2
Rohit Pawar पवार कुटुंबात तीन खासदार, दोन आमदार तरी ही घराणेशाही नाही; रोहित पवारांचा तर्क ऐका...
3
राज्य भाजपात मोठे बदल होणार?; दिल्लीत पार पडणार महाराष्ट्रातील बड्या नेत्यांची बैठक
4
एसयुव्हींमधला डार्क हॉर्स! MG Gloster Black Storm सोबत ४०२ किमी सवारी; खऱ्या खुऱ्या SUVचे मायलेज किती असेल...
5
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
6
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
7
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
8
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
9
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
10
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
11
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
12
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
13
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
14
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
15
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
16
याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान
17
भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या मार्गात 'मोठा' अडथळा; कॅरेबियन बेटांवर महत्त्वाची घडामोड
18
T20 WC 2024: श्रीलंकेचा शेवट गोड, ८३ धावांनी विजय; नेदरलँड्सला पराभवासह निरोप
19
'बोलेंगे भी और लडेंगे भी!' JNU सिनेमाचा ज्वलंत ट्रेलर, सिद्धार्थ बोडकेचा जबरदस्त अभिनय
20
Investment Post Office : ₹१०० ची पॉवर : ५ वर्षांत जमा कराल गॅरंटीड लाखोंचा फंड, समजून घ्या गणित

नवी शक्कल, कारच्या सीटमधून गांजा तस्करी; पोलिसांनी हुडकून काढला तब्बल २६५ किलो गांजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2022 6:03 PM

कारमधून नेण्यात येत असलेला २६ लाखांचा २६५ किलो गांजा जप्त, कारंजा तालुक्यात बोरगाव येथील कारवाई

वर्धा : अमली पदार्थाचीतस्करी करणारे कुठली नवीन शक्कल लढवतील याचा काहीच नेम नाही. अकोला जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या गांजा तस्करांनी चक्क कारच्या सीट आणि डिक्कीत विशिष्ट बॉक्स करून त्यात मोठ्या प्रमाणात गांजा लपविला. पण 'हम किसीसे कम नही' असेच काहीसे म्हणत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धडक कारवाई करून अकोल्याच्या दिशेने नेल्या जात असलेला तब्बल २६५ किला गांजा नाकेबंदी करून जप्त केला.

चारचाकी वाहनात मोठ्या प्रमाणात गांजा लादून त्याची अकोल्याच्या दिशेने वाहतूक केली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी नागपूर-अमरावती महामार्गावरील कारंजा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बोरगाव (ढो.) शिवारात नाकेबंदी करून काही वाहनांची तपासणी केली.

एमएच ३१ सीआर ८५२७ च्या वाहनाची बारकाईने तपासणी केली असता कारच्या सीट आणि डिक्कीत तयार करण्यात आलेल्या वेगळ्या बॉक्समध्ये मोठ्या प्रमाणात गांजा असल्याचे पुढे आले. त्यानंतर पोलिसांनी कार मधील कय्युम शहा शहन शहा (३४) रा. रहेमतनगर, बोरगाव (मं.) जि. अकोला व शरद बाळू गावंडे (३२) रा. जुनी वस्ती, पठाणपुरा चौक, मुर्तीजापूर, जि. अकोला या दोघांना ताब्यात घेत गांजाची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली कार व कारमधील २६५ किलो ३२५ ग्रॅम गांजा, मोबाइल असा एकूण ३० लाख ५ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणातील दोन्ही आरोपींविरुद्ध कारंजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक दारासिंग राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे, पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड, पोलीस उपनिरीक्षक गिरडकर, पोलीस अंमलदार प्रमोद जांभूळकर, संतोष दरगुडे, हमीद शेख, अनिल कांबळे, चंद्रकांत बुरंगे, श्रीकांत खडसे, राजेश तिवसकर, अवी बन्सोड, संजय बोगा, दिनेश बोथकर, अनुप कावळे, संघसेन कांबळे, विकास अवचट, राकेश आष्टणकर, नितीन मेश्राम, मनीष कांबळे, गणेश खेवले यांनी केली.

गांजा खरेदी विषयी जाणून घेतली जातेय माहिती

गांजा तस्करीचा ठपका ठेऊन अकोला जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या कय्युम शहा शहन शहा व शरद बाळू गावंडे याला पोलिसांनी अटक केली आहे. पण या आरोपींनी इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा नेमका कुठून खरेदी केला यासह विविध विषयाची माहिती सध्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस जाणून घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थSmugglingतस्करीwardha-acवर्धा