शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

१८ हजार विद्यार्थ्यांची कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 12:20 AM

शैक्षणिक जीवनात महत्त्वाची असलेल्या बारावीच्या परीक्षेला आजपासून प्रारंभ होत आहे. जिल्ह्यातील १८ हजार ७८३ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसणार असून ४८ परीक्षा केंद्र सज्ज करण्यात आलेले आहेत.

ठळक मुद्देबारावीची परीक्षा : ४८ केंद्र सज्ज; सहा भरारी पथके तैनात

ऑनलाईन लोकमतवर्धा : शैक्षणिक जीवनात महत्त्वाची असलेल्या बारावीच्या परीक्षेला आजपासून प्रारंभ होत आहे. जिल्ह्यातील १८ हजार ७८३ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसणार असून ४८ परीक्षा केंद्र सज्ज करण्यात आलेले आहेत. परीक्षेतील गैरप्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सहा भरारी पथकही तैनात करण्यात आले आहे. यावर्षी नागपूर बोर्डाच्या बदलत्या नियमांचे पालन करीत विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.शैक्षणिक जीवनात दहावी आणि बारावीच्या परीक्षेला सर्वाधिक महत्त्व आहे. दहावीची परीक्षा विद्यार्थ्याचे कला, विज्ञान, वाणिज्य, अभियांत्रिकी आदी क्षेत्र निश्चित करणारी तर बारावीची परीक्षा भविष्यातील उच्चशिक्षणात मिळणाऱ्या संधी प्राप्त करून घेण्यासाठी महत्त्वाची माणली जाते. नागपूर बोर्डाकडून बारावीची परीक्षा २१ फेबु्रवारी ते २० मार्च या कालावधीत घेतली जात आहे. यासाठी परीक्षा केंद्रही सज्ज करण्यात आले आहेत.यावर्षी परीक्षा देताना विद्यार्थ्यांना बोर्डाच्या नवीन नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. कुठलीही हयगय खपवून घेतली जाणार नसल्याच्या सूचना देण्यात आल्याने पालक व विद्यार्थ्यांची जबाबदारी वाढलेली आहे. यंदा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पेपरच्या अर्धा तास आधी पोहोचावे लागणार आहे. सकाळी ११ वाजता परीक्षा सुरू होणार असून त्यानंतर पाच मिनीटही उशीर झाला तर विद्यार्थ्याला परीक्षेला बसता येणार नाही. शिवाय पूर्वी तीन तासांच्या पूर्वी सर्व प्रश्नांची उत्तरे लिहून झाल्यास उत्तरपत्रिका देऊन बाहेर पडता येत होते; पण आता वेळेपूर्वी पेपर झाला असला तरी तीन तास आपल्या जागेवर बसून राहावे लागणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना यंदा वेळेचे काटेकोर पालन करीत परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.मागील वर्षीपर्यंत पेपर पोहोचविणे तथा उत्तरपत्रिका घेऊन जाण्याचे काम एकच व्यक्ती करीत होता; पण आता सहायक पर्यवेक्षक या पदाची निर्मिती करीत त्याच्यावर प्रश्नपत्रिका आणणे तथा उत्तरपत्रिका घेऊन जाणे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हा व्यक्ती दररोज बदलणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. शिवाय प्रश्नपत्रिका आता विद्यार्थ्यांसमोर परीक्षा खोलीतच उघडल्या जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. या सुधारणा करीत नागपूर बोर्डाने परीक्षेतील गैरप्रकार टाळण्याचे प्रयत्न चालविले आहेत.पाच केंद्र संवेदनशीलजिल्ह्यात पाच परीक्षा केंद्र अतिसंवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. यात लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालय आष्टी, भारत कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट, विकास कला व वाणिज्य महाविद्यालय वडनेर ता. हिंगणघाट, विद्या विकास कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय समुद्रपूर तथा श्री गजाननप्रसाद कनिष्ठ महाविद्यालय गिरड ता. समुद्रपूर या केंद्रांचा समावेश आहे. या केंद्रांवर भरारी पथकांचे विशेष लक्ष राहणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.पथकांचा परीक्षा केंद्रांवर वॉचबारावीच्या परीक्षेला २१ फेबु्रवारीपासून प्रारंभ होत आहे. या परीक्षेवर वॉच ठेवण्याकरिता जि.प. शिक्षण विभागाकडून सहा भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. यात शिक्षणाधिकारी (माध्यमिक), शिक्षणाधिकारी (निरंतर शिक्षण), शिक्षणाधिकारी (प्राथमिक), प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट), विशेष महिला भरारी पथक तथा उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचा समावेश आहे.

टॅग्स :examपरीक्षा