शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

१६.३५ लाख नागरिकांचे पैसे असुरक्षित?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील दोन घटनांमुळे पुन्हा एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सेलूच्या एटीएममधून ५.९४ लाख तर सेवाग्राम येथील एटीएममधून १२,५०० रुपये चोरट्यांनी पळवून नेले. असे असले तरी समांतर तपास करणाऱ्या सेलू, सेवाग्राम व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना सदर चोरट्यांची टोळी गवसलेली नाही.

ठळक मुद्देसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर : एटीएम पळविणारे पोलिसांपासून दूरच, बँक अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष

महेश सायखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात राष्ट्रीयकृत, खासगी आणि ग्रामीण अशा सुमारे १४२ च्यावर बँक शाखा आहेत. याच बँकांमध्ये जिल्ह्यातील १६.३५ लाखांच्यावर नागरिकांचे खाते आहे. रोकड हवी असल्यास याच खातेधारकांकडून नजीकचे एटीएम कक्ष किंवा बँक शाखेत जाऊन ती मिळविली जाते. परंतु, चोरट्यांनी सेलू व सेवाग्राम येथून थेट एटीएम पळवून नेल्याने १६.३५ लाख नागरिकांसाठीची विविध एटीएम मधील रक्कम सुरक्षित का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.जिल्ह्यातील दोन घटनांमुळे पुन्हा एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सेलूच्या एटीएममधून ५.९४ लाख तर सेवाग्राम येथील एटीएममधून १२,५०० रुपये चोरट्यांनी पळवून नेले. असे असले तरी समांतर तपास करणाऱ्या सेलू, सेवाग्राम व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना सदर चोरट्यांची टोळी गवसलेली नाही.सर्वच एटीएम कक्ष ‘सीसीटीव्ही लेस’च्वर्धा जिल्ह्यातील विविध भागात विविध बँकेचे एकूण २२४ एटीएम कक्ष आहेत. या सर्वच एटीएम कक्षांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. परंतु, त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनाही न जुमानता चोरट्यांनी एटीएम मशीनच पळवून नेल्याने एटीएम कक्ष किती सुरक्षीत असा प्रश्न उपस्थित होत आहे.पोेलिसांच्या सूचनांकडे बँक अधिकाऱ्यांची पाठच्इतर जिल्ह्यात एटीएम मशीन पळविल्याच्या घटना घडल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्यावतीने जिल्ह्यातील एटीएमच्या सुरक्षेचा दृष्टीकोण केंद्रस्थानी ठेऊन वर्धा जिल्ह्यातील सर्व बँक व्यवस्थापकांची बैठक डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पोलीस अधीक्षक कार्यालयात घेण्यात आली होती. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांकडून सर्व बँक व्यवस्थापकांना एटीएमच्या सुरक्षेबाबत आरबीआयच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन एटीएम कक्षात सुरक्षारक्षक नेमण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु, त्याकडे बँकेच्या अधिकाºयांनी दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानल्याची चर्चा सध्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये होत आहे.एसबीआयच्या एकाही एटीएमवर सुरक्षारक्षक नाहीतजिल्ह्यातील सुमारे दुसऱ्या क्रमांकाची आणि अनेकांचे विश्वास संपादीत करणारी बँक म्हणून एसबीआयची ओळख. परंतु, याच बँकेच्या ४४ एटीएम पैकी एकाही एटीएम कक्षात सुरक्षारक्षक कार्यरत नसल्याचे लोकमतच्या पाहणीत पुढे आले. अधिक माहिती घेतली असता बँकेची पॉलीसी तसी असल्याने एटीएममध्ये सुरक्षरक्षकच नेमण्यात आले नसल्याचे बँकेच्या एका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. परंतु, अधिकृतपणे बँकेची बाजू सांगा असे म्हटल्यावर या अधिकाऱ्यांने बोलण्याचे टाळण्यातच धन्यता मानली, हे विशेष.जुन्याच बंदुकीने सुरक्षाविविध बँकांच्या एटीएम मध्ये रोकड टाकण्याचे जबाबदारी बँकांनी विशिष्ट यंत्रणेला दिली असली तरी रोकड घेऊन जाणाºया कॅश व्हॅनमध्ये बंदुकधारी सुरक्षारक्षक असतो. परंतु, सध्याच्या विज्ञान युगात त्यांच्याकडेही जुन्याच बंदूका राहत असल्याने त्याही रोकडीची सुरक्षा कशी होणार असा प्रश्न नागरिकांकडून सध्या विचारला जात आहे.जिल्ह्यात अधिकृत २३४ शस्त्रधारीसेवानिवृत्त पोलीस कर्मचारी तसेच सेनेतील कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्यावतीने शस्त्र बाळगण्याचा परवाना दिल्या जातो. हेच शस्त्रधारी बहूदा सुरक्षा रक्षक म्हणून विविध बँकेत कार्यरत होतात. सदर परवान्याचे प्रत्येक तीन वर्षांनी नुतणीकरण करणे बंधनकारक असते. पण यंदाच्या वर्षी अनेकांनी परवान्याचे नुतणीकरण केलेले नाही. विशेष म्हणजे एकही शस्त्रधारी सुरक्षारक्षक सध्या जिल्ह्यातील एकाही एटीएम कक्षात कार्यरत नसल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.बँकेच्या अधिकाऱ्यांना एटीएममध्ये सुरक्षारक्षक नेमण्याबाबतच्या लेखी सूचना देण्यात आल्या आहेत. सेवाग्राम आणि सेलू येथील एटीएम चोरी बाबातचा गुन्हा उघडकीस आणण्याचा प्रयत्न पोलीस विभागाकडून केला जात आहे. लवकरच गुन्हा उघडकीस येईल.- डॉ. बसवराज तेली, पोलीस अधीक्षक, वर्धा.एटीएम मशीन पळविण्याच्या घटना चुकीच्या असून त्याला वेळीच आळा बसला पाहिजे. सदर विषय गंभीर असल्याने बीएलबीसीच्या बैठकीत सर्व बँक समन्वयक आणि व्यवस्थापकांना पाचारण करून त्यांना सुरक्षारक्षक नेमण्यासह बँकेच्या समन्वयाकाचा भ्रमणध्वनी क्रमांक त्या त्या एटीएम कक्षात लावण्याबाबत योग्य सूचना देण्यात येईल. जो बँक अधिकारी हयगय करेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.- बिरेंद्र कुमार, व्यवस्थापक, लिड बँक वर्धा.इतर जिल्ह्यात चोरट्यांनी एटीएमला टार्गेट केल्याने सुरक्षेच्या दृष्टीने सर्व बँक अधिकाऱ्यांची डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी त्यांना एटीएम कक्षात सुरक्षारक्षक नेमण्याच्याही सूचना देण्यात आल्या होत्या. एटीएम चोरी बाबत सेलू आणि सेवाग्राम येथे दाखल गुन्ह्याचा तपास सुरू असून लवकरच चोरट्यांना जेरबंद करण्यात येईल.- निलेश ब्राह्मणे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा.

टॅग्स :bankबँक