शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

जिल्ह्यात सिकलसेलचे १२ हजार ३५९ वाहक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:05 AM

महाराष्ट्र राज्यात सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम २००८ पासून सुरू झाला. वर्धा जिल्ह्यात सिकलसेलचे ९३९ रुग्ण व १२ हजार ३५९ सिकलसेलचे वाहक आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे, असे विचार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देअजय डवले : जिल्हा सामान्य रुग्णालयात जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र राज्यात सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम २००८ पासून सुरू झाला. वर्धा जिल्ह्यात सिकलसेलचे ९३९ रुग्ण व १२ हजार ३५९ सिकलसेलचे वाहक आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे, असे विचार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी व्यक्त केले.जिल्हा सामान्य रुग्णालय व नामदेव महाराज बहुउद्देशिय शिक्षण संस्था यांच्या विद्यमाने जागतिक सिकलसेल दिनाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी अतिथी म्हणून प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. थोरात, डॉ. चकोर रोकडे, डॉ. मंगेश रेवतकर, डॉ. कोडापे, डॉ. अनुजा बारापात्रे, स्मिता वासनिक, पुनसे यांची उपस्थिती होती.मार्गदर्शन करताना डॉ. डवले म्हणाले, सिकलसेल वाहकाने निरोगी व्यक्तीशी विवाह केल्यास येणारे अपल्य निरोगी जन्माला येण्याची शक्यता जास्त असते. याकरिता लग्नापूर्वी उपवर मुलांमुलींच्या रक्ताची तपासणी करणे, निरोगी सिकलसेल पिढी जन्माला येण्यासाठी गरजेचे आहे. समाजात याबाबत जनजागृती करण्याकरिता प्रत्येकांनी सर्व जाती जमातीतील लोकांनी विशेषत: अनु.जाती जमातीतील लोकांनी सिकलसेल चाचणी करण्याकरिता समाजात जनजागृती करण्याची गरज व्यक्त केली. यावेळी त्यांनी सिकलसेल रुग्णांकरिता असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली. या योजनांचा लाभ या रुग्णांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही त्यांनी या रोगाच्या जनजागृतीकरिता कार्य करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना यावेळी केले.सिकलसेल आजाराचा इतिहास वाचन मनन व चिंतन तसेच शासकीय सोईसुविधांबाबत माहिती तसेच सिकल हिमोग्लोबीन व नॉर्मल हिमोग्लोबीन याबाबत शास्त्रीय दृष्टीकोनातून माहिती देण्यात आली. याचा लाभ रुग्णांची घ्यावा असे आवाहन डॉ. थोरात यांनी आपल्या प्रमुख स्थानावरून बोलताना केले.सिकलसेल आजार हा आदिवासी भागात जास्त प्रमाणात आढळून येतो; परंतु जिल्ह्याची सिकलसेल रुग्णांची संख्या बघितल्यास या आजाराची गंभीरता लक्षात येतो, जिल्ह्यात सिकलसेलकरिता सोल्युबिलीटी व इलेक्ट्रोफोरेसीस या दोन तपासण्या असून, सोल्युबिलीटी तपासणी जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रात नि:शुल्क करण्यात येते तर, इलेक्ट्रोफोरेसीस तपासणी जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा उपजिल्हा रुग्णालय आर्वी व उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे नि:शुल्क करण्यात येते. तसेच सिकलसेल रुग्णांना आरोग्य विभागामार्फत मोफत रक्त संक्रमणाची व्यवस्था आहे. याचा लाभ रुग्णांनी घ्यावा असे मनोगत डॉ. चकोर रोकडे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन करीत उपस्थितांचे आभार सिकलसेल समुपदेशक देवांगणा वाघमारे यांनी मानले. प्रास्ताविक सिकलसेल समन्वयक अन्नपूर्णा ढोबळे यांनी केले. कार्यक्रमाकरिता प्रशांत कठाणे, अंकुश कांचनपुरे, हर्षद ढोबळे, विनोद शेट्ये, जयमाला चोरमले, पंकज महाबुधे, राहुल बुचुंडे व नर्सीग स्कूलच्या विद्यार्थ्यांनी परीश्रम घेतले. यावेळी आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Healthआरोग्य