एलईडी लाईट खरेदीत ११ लाखांचा भ्रष्टाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 10:28 PM2018-02-03T22:28:08+5:302018-02-03T22:28:44+5:30

नगरपंचायतमध्ये लावण्यात येत असलेल्या एलईडी लाईटमध्ये ११ लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप नगरसेवकांनी पत्रकार परिषदमध्ये केला आहे. याबाबतचे सबळ पुरावे त्यांनी दिले आहेत.

11 lakhs corruption in LED light purchase | एलईडी लाईट खरेदीत ११ लाखांचा भ्रष्टाचार

एलईडी लाईट खरेदीत ११ लाखांचा भ्रष्टाचार

Next
ठळक मुद्दे भाजप नगरसेवकांचा पत्रकार परिषदेत आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : नगरपंचायतमध्ये लावण्यात येत असलेल्या एलईडी लाईटमध्ये ११ लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप नगरसेवकांनी पत्रकार परिषदमध्ये केला आहे. याबाबतचे सबळ पुरावे त्यांनी दिले आहेत.
विश्रामगृहात आयोजित या पत्रपरिषदेत भाजपा शहर अध्यक्ष तथा नगरसेवक अ‍ॅड. मनीष ठोंबरे, नगरसेवक सुरेश काळपांडे, अजय लेकुरवाळे यांनी माहिती दिली. आष्टी नगरपंचायत अंतर्गत आष्टी शहरात सार्वजनिक लाईट बसविण्याची निविदा काढली होती. सदर निविदा काढताना विरोधी पक्षाच्या नगसेवकांना कुठलीही माहिती दिली नाही. सभागृहात यावर काहीही चर्चा करण्यात आली नाही. ई-निविदा विषय घेताना सभागृहाला माहिती देणे अनिवार्य होते; पण तसे झाले नाही.
निविदा प्राप्त झालेले आर्वी येथील ठेकेदार कदम यांनी हिंदुस्थान कंपनीचे एलईडी लाईट दाखविले. एका लाईटची किंमत ४,८०० ते ५,२०० या दराने मंजूर केली. मार्केटमध्ये अशी कुठलीही कंपनी अस्तित्वात नसल्याचा आरोपही करण्यात आला. निविदेतील अटी व शर्तीनुसार पथदिव्यांवर लावण्यात आलेले एलईडी लाईट नामांकित कंपनीचे आय.एस.ओ. मार्क पाहिजे होते; पण बाजारपेठेत नामांकित कंपनीच्या एलईडी लाईटच्या दराबाबत पडताळणी केली असता फिलीप्स कंपनीचे दर २ हजार ५०० रुपये असून ४ वर्षांची वॉरंटी दिली जाते. ओसाराम कंपनीचे लाईट १ हजार ८०० रुपये तर सिसका कंपनीचे दर २ हजार ६५० रुपये असून ४ वर्षे वॉरंटी दिली जात असल्याचे निदर्शनास आले.
नगरपंचायत मार्फत निम्न दर्जाचे कंपनीचे एलईडी लाईट चढ्या दराने खरेदी करण्यात आले. सध्या झालेली निविदा एकूण २२ लाख ३६ हजार ८१२ रुपये एवढ्या किंमतीची आहे. एवढ्या रक्कमेमध्ये ३५० एलईडी लाईट लावायचे आहे. त्यामुळे मूळ मुल्यांकन काढले तर केवळ ११ लाख मध्ये ३५० लाईट लावणे शक्य आहे. मग, शासनाच्या निधीची अपव्यय करून विल्हेवाट लावण्याची सक्ती का? हा प्रश्न सभागृहात कायम आहे. नगर पंचायतमध्ये योजनेची माहिती न देता परस्पर निविदा मॅनेज करून निकृष्ट दर्जाची कामे व गैरप्रकाराला थारा दिला जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
सभागृहात ठराव मंजूर झाल्याशिवाय व नगरसेवकांना विश्वसात घेवून चर्चा केल्याशिवाय सदर ठेकेदाराचे देयक काढू नये, अशी मागणी भाजप नगरसेवकांनी केली आहे. शिवाय या प्रकरणाची चौकशी जिल्हाधिकाºयांनी करावी, अशी मागणीही त्यांच्यावतीने यावेळी करण्यात आली.

एलईडी लाईटबाबत सभागृहात चर्चा करून ठराव झाला. त्याप्रमाणे रितसर ई-निविदा झाली. नियमाप्रमाणेच कामकाज सुरू आहे. यात कुठलाही भ्रष्टाचार झाला नाही.
- पंकज गोसावी, मुख्याधिकारी, नगर पंचायत, आष्टी (शहीद).

Web Title: 11 lakhs corruption in LED light purchase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.