शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
2
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
3
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
4
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
5
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
6
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
7
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
8
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
9
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
10
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
11
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
12
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
13
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
15
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
16
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
17
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
18
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
19
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

१० गावात होते रात्रभर जागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 12:17 AM

वाघीण येईल आणि हल्ला करेल, या भीतीपोटी जंगलव्याप्त असलेल्या दहा गावातील नागरिकांच्या डोळ्यातील झोप बेपत्ता झाली आहे.

ठळक मुद्देवाघिणीची दहशत : गावकरी भयभीत; प्रशासनही आले घायकुतीस

अमोल सोटे ।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : वाघीण येईल आणि हल्ला करेल, या भीतीपोटी जंगलव्याप्त असलेल्या दहा गावातील नागरिकांच्या डोळ्यातील झोप बेपत्ता झाली आहे. हातात लाठ्या आणि टेंभे घेवून गावकरी गटागटात विभाजित होवून जागली करीत आहे. वाघिणीच्या भीतीपोटी शेताकडे दुर्लक्ष झाल्याने तोंडचा घास जाण्याचीही भीती गावकºयांकडून वर्तविली जात आहे. वाघिणीच्या दहशीतीत असलेल्या या १० गावांत गत तीन दिवसांपासून गावकरी पहरेदार झाले आहेत.वडाळा, पोरगव्हाण, पंचाळा, झाडगाव, सत्तरपूर, टुमणी, बोरगाव, धाडी, येनाडा, पिलापूर ही गाव घनदाट जंगलाच्या कुशीत आहे. गावाच्या सभोवताल जंगल, शेती असा भाग टप्प्याटप्प्यांनी व्यापला आहे. या नरभक्षक वाघिणीच्या गळयाला कॉलर आयडी असताना वनविभागाला ती सापडू नये यावर गावकरी संतप्त आहे.भिवाजी हरले यांचा बळी गेल्यावर इतर शेतकरी यांचा भिवाजी होवू नये अशी अपेक्षा गावकºयांची आहे. शंभरावर ताफा जंगलात दोन दिवसांपासून कोम्बींग आॅपरेशन करीत आहे. कॉलर आयडीवरुन १ किमी टप्पा सहज वेढा घातला येतो; पण लोकेशन परफेक्ट मिळत नसल्याने कॉलर आयडी वाघिणीच्या गळ्यातून गायब झाल्याचा आरोप होत आहे.वडाळा, पोरगव्हाण, पंचाळा गावातील नागरिक प्रचंड दहशतीत आहे. शेताकडे दुर्लक्ष झाल्याने कपाशी, सोयाबीन, तूर, ज्वारी, भुईमुग पिकांना हानी पोहचली आहे. मात्र वाघिण येईल हल्ला करील, जीव जाईल या भीतीने गावातील कुणीही शेतकरी शेतात जाणार नाही असे सांगितले. रात्रभर लाठ्या-काठ्या घेवून रॉकेलचे टेंभे लावून सजग पहारा दिल्या जात आहे.वीज वितरणकडूनही चटकेवीज वितरण कंपनीची सेवा कोलमडल्याने वीजपुरवठा दिवसभर व रात्री ११ पर्यंत खंडित असल्याने अंधाराच्या साम्राज्याने काहूर माजविला आहे. दुरुस्तीचे काम धिम्या गतीने सुरू आहे. शेतातील विहिरीवरील पाण्याच्या मोटर, स्टार्टर, वायर चोरीला जात आहे. जीव गमावून काय करायचे असे म्हणज शेतकरी हतबल झाल्याचे पाहावयास मिळत आहे. सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनी गावकºयांना धीर देणे सुरू केले आहे.