शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

देवभूमीत भाजप ‘शतप्रतिशत’ची हॅट्ट्रिक साधणार? गेल्या दाेन निवडणुकांत काॅंग्रेसला एकही जागा नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 6:43 AM

आता तिसऱ्यांदा भाजप ‘शतप्रतिशत’ची हॅट्ट्रिक साधणार का, की काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडी मुसंडी मारणार, हे पाहावे लागणार आहे.

- संतोष सूर्यवंशीडेहराडून : लोकसभा निवडणुकीच्या गेल्या दोन्ही पंचवार्षिकमध्ये भाजपने उत्तराखंडमध्ये ‘शतप्रतिशत भाजप’चा नारा बुलंद केला आहे. उत्तराखंडमध्ये २०१४ व २०१९च्या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपनं येथील सर्वच्या सर्व पाचही जागा जिंकत प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या काँग्रेसचा सुपडा साफ केला होता. आता तिसऱ्यांदा भाजप ‘शतप्रतिशत’ची हॅट्ट्रिक साधणार का, की काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडी मुसंडी मारणार, हे पाहावे लागणार आहे.

बद्रीनाथ, केदारनाथ अशा पवित्र धामांमुळे देवभूमी असे बिरुद मिरवणारे राज्य म्हणजे उत्तराखंड. येथे लोकसभेच्या गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपनं काँग्रेसला डोक वर काढू दिलेलं नाही. लोकसभेच्या पाच जागांपैकी दोन जागा नैनिताल-उधम सिंगनगर व अल्मोरा हे कुमाऊं प्रदेशात, तर, उर्वरित हरिद्वार, टेहरी गढवाल अन् गढवाल (पौरी) या जागा गढवाल प्रदेशात मोडतात. 

काय होती २०१९ची स्थिती? केंद्रीय पर्यटन आणि संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी २०१९च्या लोकसभा निवडणुकीत नैनिताल-उधम सिंगनगर या मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांचा तब्बल ३ लाख ३९ हजार ९६ मतांनी पराभव केला होता. अल्मोरा लोकसभा मतदारसंघात भाजपचे अजय टमटा त्यांनी काँग्रेसच्या प्रदीप टमटा यांचा दोन लाख ३२ हजार ९८६ मतांनी पराभव केला होता. गढवाल (पौरी) मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री तीर्थसिंग रावत यांनी काँग्रेसच्या मनीष खंडुरी यांचा ३ लाख २ हजार ६६९ मतांनी पराभव केला होता.  टिहरी लोकसभा मतदारसंघातून माला राज्य लक्ष्मी शाह यांनी २०१९ मध्ये सलग तिसऱ्यांदा काँग्रेसच्या प्रीतम सिंग यांचा ३ लाख ५८६ मतांनी पराभव केला होता, तर माजी मुख्यमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी हरिद्वारमध्ये काँग्रेसच्या अंबरीश कुमार यांचा २ लाख ५८ हजार ७२९ मतांनी पराभव केला होता. पोखरियाल यांचा २०१९मध्ये या जागेवरून सलग दुसरा विजय होता. त्यांनी २०१४ मध्ये हरीश रावत यांच्या पत्नी रेणुका रावत यांचा १ लाख ७७ हजार ८२२ मतांनी पराभव केला होता.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Uttarakhandउत्तराखंडBJPभाजपा