शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

नमामी गंगे प्रोजेक्ट साईटवर भीषण अपघात; ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटात 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 13:27 IST

ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाल्याने करंट लागून एक पोलीस अधिकारी आणि पाच होमगार्डसह 15 जणांचा मृत्यू झाला. या घटनेत अनेकजण गंभीररित्या भाजले गेले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Chamoli Accident: गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात पाऊस आणि पूरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यातच आता जिल्ह्यातील अलकनंदा नदीच्या काठावर बुधवारी मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. नमामी गंगे प्रकल्पाच्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाल्याने करंट लागून 15 जणांचा मृत्यू झाला आहे.

मुसळधार पावसानंतर उत्तराखंडमधील चमोली, हरिद्वार, रुद्रप्रयागसह अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती कायम आहे. दरम्यान, बुधवारी चमोली येथे अलकनंदा नदीच्या काठावर ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन 15 जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले. चमोलीचे एसपी परमेंद्र डोवाल यांनी या घटनेची माहिती दिली आहे. अपघातात अनेक जण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. चमोलीच्या घटनेवर शोक व्यक्त करत मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत.

जखमींवर उपचार सुरू एसपींनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात जखमी झालेल्या सर्व लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या या सर्वांवर उपचार सुरू आहेत. उत्तराखंडचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व्ही मुरगेशन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात पोलीस चौकीच्या प्रभारीसह पाच होमगार्डयाही मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे संतप्त नागरिक ऊर्जा महामंडळावर निष्काळजीपणाचा आरोप करत आहेत. तसेच, महापालिकेवरही कारवाई करण्याची मागणी होत आहे. अपघातानंतर प्रकल्पाचे काम थांबवण्यात आले आहे. 

टॅग्स :AccidentअपघातUttarakhandउत्तराखंडBlastस्फोटDeathमृत्यूriverनदी