शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

मुलाला भेटण्याची ओढ; पत्नीचे दागिने गहाण ठेवून बोगद्याजवळ पोहोचला 'बाप'माणूस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 16:06 IST

वडिलांनी चक्क पत्नीचे दागिने सोनाराकडे गहाण ठेऊन उत्तरकाशी गाठली.  

डेहरादून - अखेर गेल्या १६ दिवसांपासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज यशस्वी झाली असून उत्तरकाशी येथील बोगद्यातील मजुरांपर्यंत एनडीआरएफ जवानांची टीम पोहोचली आहे. त्यामुळे, काही वेळातच बोगद्या अडकलेले मजूर सुखरुप बाहेर येणार आहेत. या मजुरांच्या स्वागतला राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून ते अनेक मान्यवर उपस्थित आहेत. तर, मजुरांचे कुटुंबही त्यांच्या मूळ गावाहून उत्तरकाशी येथील बोगद्याबाहेर आपल्या मुलांची, वडिलांची, भावाची आप्तेष्टांची कासावीस होऊन वाट पाहत आहेत. बोगद्यातील आपल्या मुलापर्यंत पोहोचण्यासाठी एका वडिलांनी चक्क पत्नीचे दागिने सोनाराकडे गहाण ठेऊन उत्तरकाशी गाठली.  

बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या सुटकेकडे गेल्या १७ दिवसांपासून भारतासह अवघ्या जगाच्या नजरा लागल्या आहेत. बोगद्यात अडकलेल्या मुजरांचे नेमके काय झाले, ते सुखरुप आहेत का, असे अनेक प्रश्न कुटुंबीयांसह प्रशासन आणि बचाव पथकाला पडले होते. अखेर, एका कॅमेऱ्याद्वारे मजुरांशी संवाद साधल्यानंतर सर्वांचाच जीव भांड्यात पडला. त्यानंतर, युद्धपातळीवर या मजुरांना बोगद्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले होते. या प्रयत्नांना अखेर यश आले असून एनडीआरएफची टीम तिथपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे, काही क्षणातच हे मजुर बोगद्यातून बाहेर येणार आहेत. बाहेर येताच आपल्या कुटुंबीयांना बिलगणार आहेत. कारण, मृत्यूच्या दाढेतून बाहेर येणं ते काय असतं हा थरार त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांना गेल्या १७ दिवसांपासून अनुभवला आहे. 

सर्वजण रोजंदारी मजूर असल्याने अर्थातच त्यांची परिस्थिती बेताचीच. त्यामुळे, आपल्या लेकरांना भेटण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनीही प्रयत्नांची पराकाष्टा केली आहे. उत्तरकाशी येथे येण्यासाठी पत्नीचे दागिने सोनाराकडे गहाण ठेऊन पैसे गोळा केले. ९ हजार रुपये घेऊन मी इथे आलो होतो, आता २९० रुपये शिल्लक राहिले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून इथे असल्याने हळू हळू पैसे खर्च होत आहेत, असे म्हणत बोगद्यात अडकलेल्या मजुराच्या वडिलांनी आपली व्यथा माध्यमांसमोर मांडली. 

बोगद्यातून बाहेर काढल्यानंतर डेहरादून येथे सर्वांना नेण्यात येणार आहे. तिथे गंगास्नान करुन त्यांना पुढील ठिकाणी पाठवण्यात येईल. आज सकाळपासूनच हलकासा पाऊस पडत आहे. सर्व मजूर बाहेर येत असताना देवानेही आशीर्वाद दिल्याचा हा शुभशकून आहे. बोगद्यातून आमचा मुलगा बाहेर येईल आणि आमच्या जीवात जीव येईल, असे म्हणत मजुराच्या वडिलांनी मुलगा सुखरुप परत येत असल्याचा आनंद व्यक्त केला. तसेच, मुलाला वापर नेण्यासाठी त्याचे कपडे आणि आवश्यक सामानही घरुन आणलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

कुटुंबीय बोगद्याबाहेर, सर्वांचाच जीव भांड्यात पडला

बोगद्यात खोदाई संपली असून अडकलेल्य़ा ४१ मजुरांपर्यंत ८०० मीमी व्यासाचा पाईप टाकण्यात आले आहेत. या पाईपमधून एनडीआरएफची टीम मजुरांपर्यंत पोहोचली आहे. बोगद्यामध्ये अॅम्ब्युलन्स आणि डॉक्टरांना देखील बोलविण्यात आले आहे. सर्वच्या सर्व ४१ मजूर ठीक असावेत अशी प्रार्थना केली जात आहे. रेस्क्यू टीमने मजुरांच्या कुटुंबीयांना बोलावून त्यांचे कपडे आणि बॅग तयार ठेवण्यास सांगितले आहेत.  

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडLabourकामगारFamilyपरिवारRainपाऊसNational Disaster Response Forceराष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल