Prayagraj News: तरुणीचे केस जनरेटरमध्ये अडकले; डोक्याची त्वचा उपटल्याने 700 टाके...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 13:50 IST2023-05-23T13:49:21+5:302023-05-23T13:50:15+5:30
Prayagraj News: कार्यक्रमात महिला डान्स करत होत्या, यावेळी तरुणीचे केस जनरेटरमध्ये अडकले.

Prayagraj News: तरुणीचे केस जनरेटरमध्ये अडकले; डोक्याची त्वचा उपटल्याने 700 टाके...
प्रयागराज: उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील सैदाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कार्यक्रमात DJ च्या गाण्यावर डान्स करताना एका मुलीचे केस जनरेटरमध्ये अडकले. या घटनेत मुलीच्या डोक्यावरील त्वचेसह केसही उपटले गेले आहेत. या अपघातात मुलगी रक्तबंबाळ झाली. नातेवाइकांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. डोक्यातून होणारा रक्तस्राव थांबवण्यासाठी डॉक्टरांना अनेक टाके घालावे लागले.
डीजेच्या तालावर महिला नाचत होत्या
सैदाबाद येथे एक धार्मिक कार्यक्रम गावातील महिला डीजेच्या तालावर सामूहिक नृत्य करत होत्या. गावातील लोक अतिशय आनंदाने डान्स करत होते, यावेळी कार्यक्रमात जनरेटर लावण्यात आला होता. पण, नाचत असताना जनरेटरमध्ये मुलीचे केस अडकले. गुंजा(वय 16) असे जखमी मुलीचे नाव आहे. अपघातानंतर मुलगी जागीच बेशुद्ध झाली, तिच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
डॉक्टरांनी सांगितले की, या अपघातात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिच्या डोक्याला सुमारे 700 टाके पडले आहेत. या घटनेत तिच्या डोक्याचे केस पूर्णपणे उपटले गेले आहेत. डॉक्टरांनी वेळीच उपचार केल्यामुळे तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, मुलीची जखम बरी होण्यासाठी वेळ लागेल. जखमा थोड्या बऱ्या झाल्या की, सीटी स्कॅन करुन उपचाराची पुढील दिशा ठरवली जाईल. या घटनेमुळे तरुणीच्या घरच्यांना मोठा धक्का बसला आहे.